Breaking-newsपिंपरी / चिंचवड
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित रयत विद्यार्थी विचार मंचच्या वतीने अभिवादन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/karmveer-anna.jpg)
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
पद्मश्री डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त रयत विद्यार्थी विचार मंचच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
पिंपरी कार्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती साजरी करण्यात आली. त्यांच्या प्रतिमेला अध्यक्ष धम्मराज साळवे व कार्याध्यक्षा अंजना गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी महासचिव संतोष शिंदे, सचिव नीरज भालेराव उपस्थित होते.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/IMG-20200922-WA0004-1-1024x542.jpg)