breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

औद्योगिकनगरीत दुचाकीचोरांचा सुळसुळाट; नागरिकांमध्ये भिती अन्‌ पोलिसांची डोकेदुखी

पिंपरी । गुन्हेवृत्त ।

औद्योगिक वसाहत असलेल्या चाकण परिसरात गेल्या काही दिवसांपासून दुचाकीचोरांचा सुळसुळाट झाला आहे. परिणामी, नागरिकांमध्ये असुरक्षितता वाढली असून, पोलीस प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.

चाकण पोलीस ठाण्यामध्ये गुरूवारी दुचाकीचोरीच्या तीन गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. खराबवाडी येथे राहणारे अजित धिवरे (वय-३९) यांची हिरो स्प्लेंडर प्लस (क्र. एम. एच. १४, जी.पी. ४४४०) राहत्या घरापासून चोरीला गेली आहे. याबाबत अज्ञात चोरट्यावर चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवण्यात आली आहे.  याप्रकरणी पोलीस हवालदार पवार पुढील तपास करीत आहेत.

दुसऱ्या घटनेत, रियासद हसन अन्सारी (वय-३३) यांनी फिर्याद नोंदवली आहे. अन्सारी कुरळी येथे राहतात. मौजे नाणेकरवाडी येथून त्यांची हिरो पॅशन प्रो ही दुचाकी (क्र. एम. एच. १४, ३५१२) चोरीला गेली आहे. अन्सारी यांनी नाणेकरवाडी येथील ॲटो लाईन कंपनीसमोर मोटारसायकल पार्क केली होती. याप्रकरणी सहायक फौजदार मोरे पुढील तपास करीत आहेत.

तिसऱ्या घटनेत, नाणेकरवाडी येथील मिंडा कंपनीच्या गेटसमोरुन दुचाकी लंपास करण्यात आली आहे. अमोल लंघे (वय-३२, रा. करडे, ता. शिरुर) यांनी याबाबत फिर्याद नोंदवली आहे. लंघे यांची स्प्लेंडर प्लस मोटार सायकल (क्र. एम. एच. १२, डी. क्यू. १४८५) ही अनोळखी चोरट्याने लंपास केली आहे. याबाबत पोलीस नाईक गायकवाड पुढील तपास करीत आहेत.

****

निगडी, चिखलीतही दुचाकी चोरीची घटना

पिंपरी-चिंचवडमध्येही दुचाकी चोरीच्या घटना वाढू लागल्या आहेत. थरमॅक्स चौक येथील सुमा क्रिष्णा मोबाईल शॉपीसमोरुन विमलेश चंचल (वय-२८, रा. महादेव मंदिराजवळ, पिंपळे सौदागर) यांची होंडा ॲक्टीव्‍हा दुचाकी (क्र. एम.एच. १४, एफ यू ८६९१)  चोरीला गेली आहे. याबाबत निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक वाघमारे पुढील तपास करीत आहेत. तसेच, चिखली येथील विकास हौसिंग सोसायटी, कृष्ण मंदिराजवळ, रुपीनगर येथून दुचाकी चोरीची घटना घडली. साधु आडके (वय-४३) यांनी याबाबत फिर्याद नोंदवली आहे. आडके यांची होंडा सीडी डिलक्स मोटार सायकल (क्र. एम.एच. १२, एफ एल ३४९३) घरासमोर पार्क केली होती. दि.३ जुलै ते ४ जुलैच्या रात्री अज्ञात इसमाने ही दुचाकी चोरली आहे. याबाबत चिखली पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक सोमवंशी पुढील तपास करीत आहेत.

****

‘आयटी हब’ हिंजवडीतही चोरट्यांचा उच्छाद…

‘आयटी हब’ हिंजवडी परिसरातही दुचाकी चोरांनी उच्छाद मांडला आहे. हॉटेल पंजाब रसोई येथील भानुसेवस्तीकडे जाणा-या रस्त्यावर पार्क केलेली दुचाकी लंपास करण्यात आली. औंकार तावरे (वय-२५, रा. राजक्ला सिक, औंध) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यांची यामाहा कंपनीची दुचाकी (क्र. एम.एच. १२, के ए ००४६) ही अज्ञात चोरट्याने लंपास केली आहे. याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. पोलीस उपनिरीक्षक एन. आर. आंगज तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button