breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

ओढ्यावर कपडे धुणा-या अल्पवयीन मुलीला उसाच्या फडात ओढून बलात्काराचा प्रयत्न

पिंपरी | महाईन्यूज

ओढ्यावर कपडे धुणा-या 16 वर्षाच्या मुलीला उसाच्या फडात ओढून नेऊन तिच्यावर बलात्कार करण्याचा धक्कादायक प्रयत्न झाला आहे. या लिंगपिसाट नराधमाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकारानंतर समाजात शरमेने मान खाली घालण्याची वेळ ओढवल्याची भावना मनात निर्माण झाल्याने पीडित मुलीने स्वतःला कायमचे संपवण्याचा प्रयत्न केल्याचीही बाब समोर आली आहे. ही खळबळजनक घटना 23 ऑक्टोबर 2020 रोजी खेड तालुक्यातील मरकळ याठिकाणी घडली आहे.

तुषार दत्तु दिघे (वय 18, रा. कोयाळी, ता. खेड, जि. पुणे) याला आळंदी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बाल लैंगिक अत्याचार अधिनियम कायद्यानुसार त्याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित मुलीची मानसिक तयारी झाल्यानंतर तिने आज तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी कपडे धुण्यासाठी मरकळ येथील आश्रय हॉटेलच्या पाठीमागील पत्राशेडच्या बाजुने वाहणा-या ओढ्यावर गेली होती. कपडे धुताना तुषारने तिला जबरदस्ती केली. तिने प्रतिकार केल्यानंतर तुषारने तिला बाजुलाच असलेल्या उसाच्या फडात ओढत नेले. तिला खाली पाडून तिच्या अंगाशी लगट करायला सुरूवात केली. मुलीच्या सर्वांगाशी झोंबाझोबी करत तुषारने तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला.

मुलीच्या चारित्र्यावर घाला घातल्याने शरमेने मान खाली घालण्याचा लज्जास्पद प्रसंग आपल्यावर ओढवल्याची भावना मनात निर्माण झाल्याने पीडितेने शेतातील पिकावर फवारण्याचे विषारी औषध प्राशन करून स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला. वनेळीच हा प्रकार घरच्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी मुलीला चाकण ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. आजरोजी तिची प्रक्रती बरी झाल्यानंतर तिने मनाची तयारी ठेवून नराधमाच्या विरोधात पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर आळंदी पोलिसांनी तुषारला तत्काळ ताब्यात घेतले आहे.

घटनेतील पीडित मुलगी ही 16 वर्षाची आहे. तिच्यावर अतिप्रसंग करणा-या तरुणाला ताब्यात घेतले आहे. पुढील तपासाच्या अनुषंगाने चौकशी केली जात आहे, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक सागर यांनी सांगितली. पुढील तपास आळंदी पोलीस करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button