Breaking-newsपिंपरी / चिंचवड

ऑक्सिजन बेड्सची संख्या वाढवून कोविड सेंटरचे काम जलद गतीने करावे – उपमुख्यमंत्री अजित पवार

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

नेहरूनगर येथे उभारण्यात येत असलेल्या कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन बेड्सची संख्या वाढवून कोविड सेंटरचे काम जलद गतीने करण्यात यावे अशा सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिल्या.

पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या माध्यमातून अण्णासाहेब मगर स्टेडियम, नेहरूनगर येथे उभारण्यात येत असलेल्या ८०० खाटांच्या कोविड सेंटरच्या बांधकामाच्या कामकाजाची पाहणी करण्यासाठी असता ते बोलत होते.

यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, उपमहापौर तुषार हिंगे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके. स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, मनसे गटनेते सचिन चिखले, अपक्ष आघाडी गटनेते कैलास उर्फ बाबा बारणे, नगरसदस्य योगेश बहल, राजू मिसाळ, समीर मासुळकर, राजू बनसोडे, अजित गव्हाणे, पंकज भालेकर, नगरसदस्या वैशाली घोडेकर, गीता मंचरकर, आयुक्त श्रावण हर्डीकर, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे आयुक्त सुहास दिवसे, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अजित पवार, प्रवीण तुपे, पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक रुबल अगरवाल, शहर अभियंता राजन पाटील, अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, सहाय्यक आयुक्त स्मिता झगडे, माजी महापौर संजोग वाघेरे, माजी नगरसदस्य मारुती भापकर तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी आदी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button