breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

एमआयएमच्या औरंगाबादमधील नगरसेविकेवर निलंबित नगरसेवकाकडून बलात्कार

पुणे – ओळखीचा गैरफायदा घेऊन पिस्तुलाचा धाक दाखवून खराबवाडी (ता. खेड) येथील सारा सिटीमधून एका महिलेस खंडाळा येथील वाॅटर पार्कमध्ये नेऊन विनयभंग केला. तर बारामती, औरंगाबाद या ठिकाणी गुंगीचे औषध देऊन वेळाेवेळी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समाेर आली आहे.

याप्रकरणी एमआयएमचा निलंबित नगरसेवक मतीन रशीद सय्यद ( रा. टाऊन हॉल, आसफिया कॉलनी, जयभीम नगर, औरंगाबाद ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर मतीनचा भाऊ आणि मेहुणा यांनी पीडित महिलेचा विनयभंग केला आहे. याप्रकरणी तिघांवर चाकण पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिला आणि मतीन हे 2015 साली औरंगाबाद महापालिकेमधून एकाच पक्षातून निवडून आले हाेते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलंबित नगरसेवक मतीन आणि फिर्यादी महिला हे दोघे ओळखीचे आहेत. २७ वर्षीय पीडित महिलेला मतीनने तुमची आई आजारी आहे असं सांगून पीडित महिलेसह दोन मुलांना मोटारीत बसवून खंडाळा येथील वॉटर पार्क येथे घेऊन गेला. हि घटना दि. २६ नोव्हेंबर २०१८ रोजी सकाळी साडेनऊ ते २४ फेब्रुवारी २०१९ रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत खंडाळा येथील वॉटर पार्क, कृष्णानगर रेसिडेन्सी बारामती, टाऊन हॉल औरंगाबाद, गिरीजा हॉटेल लॉज शरणापूर फाट्याजवळ औरंगाबाद, औरंगाबाद हर्सूल येथील एका घरात वेळोवेळी घडली.

पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून मतीन रशीद सय्यद ( रा. टाऊन हॉल, आसफिया कॉलनी, जयभीम नगर, औरंगाबाद ), हामेद सिद्धकी ( रा. रेल्वे स्टेशन, औरंगाबाद – मतीनचा मेव्हुणा ) व मोहसीन रशीद सय्यद ( रा. टाऊन हॉल, औरंगाबाद – मतीनचा भाऊ ) या तीन जणांवर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महिला उपनिरीक्षक शिंदे मॅडम पुढील तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button