breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘एचए’ च्या जागेवर पोलीस आयुक्तालयाचा प्रस्ताव!

महापालिका प्रशासनाची तयारी : कंपनीतील ५६ एकर जागेच्या विक्रीची केंद्राकडून परवानगी

पिंपरी । प्रतिनिधी

केंद्र सरकारच्या पिंपरीतील हिंदूस्थान अॅन्टीबायोटिक्स (एचए) कंपनीची 56 एकर जागा महापालिकेने आरक्षित केली आहे. जागेचा ताबा व मोबादला देण्याबाबत चर्चा देखील सुरू आहेत. मात्र, याच जागेवर आता पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाचा देखील प्रस्ताव आहे. गृह विभागाने येथे दहा एकर जागेची मागणी केली असून जागा देण्याची पिंपरी-चिंचवड महापालिकेची देखील तयारी आहे.

पिंपरी येथील एचए कंपनी आर्थिक अडचणीत आहे. त्यासाठी या कंपनीची 56 एकर जागा विक्रीची परवानगी केंद्र सरकारने दिली आहे. मात्र, पिंपरी-चिंचवड महापालिकेने ही जागा  बहुउद्देशीय मैदानासाटी आरक्षित केली. तसेच, कंपनीकडे मोबादला घेऊन ही जागा महापालिकेला हस्तांतरीत करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, ही जागा शहराच्या मध्यवर्ती आहे. त्यामुळे शहरात झालेल्या स्वतंत्र पोलीस आयुक्तालयासाठी ही जागा घेण्याची मागणी लोकप्रतिनिधींकडून केली जात होती.

त्या पार्श्वभूमीवर महापालिकेनंतर गृह विभागाकडून देखील एचए कंपनीची ही जागा मिळावी, ही मागणी करण्यात आली आहे. पोलिस आयुक्तालयासाठी दहा एकर जागेची मागणी त्यांनी केली  आहे. त्यामुळे 56 एकरापैकी दहा एकर पोलिस आयुक्तालयासाठी, तर उर्वरित 46 एकर पिंपरी-चिंचवड महापालिकेला मिळू शकणार आहे. त्यासाठी बैठका आणि चर्चा सुरू आहेत. मात्र, मध्यंतरी कोरानाच्या कालावधीत यावर कोणता निर्णय झाला नाही. मात्र, कंपनीची जागा देण्याची तयारी असून महापालिका, पोलिसांना ही जागा हवी असल्याने लवकरच त्यावर निर्णय होईल, अशी माहिती वरिष्ठ अधिका-यांनी दिली आहे.

चिखलीतील जागेचाही पर्याय…

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने एचए कंपनीची जागा मध्यवर्ती असल्याने तिची मागणी केली आहे. मात्र, या जागेबरोबर पोलिसांकडे चिखली येथील प्राधिकरणाच्या जागेचा देखील पर्याय आहे. त्यांनी यापूर्वी चिखलीतील एक भुखंड देखील पोलिस आयुक्तालयासाठी मागितला आहे. आयुक्तालयाचे पिंपरी-चिंचवडसह तळेगाव दाभाडे, चाकण, हिंजवडी हे कार्यक्षेत्र विचारात घेता चिखलीचा पर्याय देखील त्यांच्यासमोर आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button