breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

एकतर्फी प्रेमातून तरुणाची आत्महत्या, नकार दिल्यामुळे तरुणीसमोरच घेतली कृष्णा नदीत उडी

सांगली – एकतर्फी प्रेमातून 24 वर्षीय तरुणाने नदीत उडी घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आत्महत्या केलेल्या तरुणाचे ज्या तरुणीवर प्रेम होते, तिच्यासमोर त्याने नदीत उडी घेतली. यावेळी नदीत पोहत असलेल्या इतर लोकांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्नही केला पण त्यांना यश आले नाही.

अबरार झाकीर मुलाणी असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याचे तरुणीवर एकतर्फी प्रेम होते, तिला आपल्या प्रेमाची कबुल देण्यासाठी कष्णा नदीवर घेऊन आला. त्यानंतर ते दोघे नदीवर स्वामी समर्थ घाटावर बोलत बसले. यावेळी त्याने अनेकवेळा तिच्यावर प्रेम असल्याचे तिला सांगितले, पण तिने आपण दोघे चांगले मित्र आहोत आणि राहू असे उत्तर दिले.

काही वेळेनंतर ते दोघे तेथून निघाले. यावेळेस हताश झालेल्या अबरार ती थोडं थांब मी नदीत जाऊन येतो असे सांगितले. त्यानंतर त्याने नदीत उडी घेतली. काही वेळेनंतर तरुणीला तो बुडत असल्याचे कळाले, तिने आरडा-ओरड केला. यावेळी नदीत पोहत असलेल्या इथर लोकांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला पण तोपर्यंत तो बुडाला होता.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अबरारचा शोध सुरू केला. अंदाजे 6 तासानंतर त्याचा मृतदेह मिळाला. पोलिसांनी तरुणीची साक्ष नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button