breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

उपमुख्यमंत्री अजित पवारांचा राजीनामा ! पिंपरी-चिंचवड भाजपच्या आनंदावर विर्जन

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी भजपाला पाठिंबा दिल्यानंतर राज्यात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवारांच्या बंडखोरीने भाजपला कमालीचे बळ आले होते. या आनंदी वातावरणात पिंपरी-चिंचवड भाजपच्या वतीने पक्ष कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी ”मी पुन्हा आलो” असे म्हणत जल्लोष केला होता.

आता अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समजते. अजित पवार यांच्या राजीनाम्याने फडणवीस यांच्यासह भाजपच्या दिग्गजांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. एकीकडे न्यायालयाने उद्या सायंकाळी पाचपर्यंत बहुमत सिध्द करण्याचे आदेश दिले असताना दुसरीकडे अजित पवार यांचा राजीनामा आला असताना भाजप नेत्यांची चांगलीच गोची झाली आहे. अजित पवार यांनी भाजपची साथ सोडल्याने आता फडणवीस सरकार कसे स्थापन होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना सोबत घेऊन सरकार स्थापन करण्याचे संकेत दिल्यानंतर राज्यभरासह पिंपरी-चिंचवड शहर भाजपच्या वतीने पक्ष कार्यालयासमोर आनंदोत्सव साजरा करत कार्यकर्त्यांनी जल्लोष केला होता. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन भाजपला झटका दिल्याने कार्यकर्त्यांच्या आनंदावर विर्जन पडले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button