breaking-newsपिंपरी / चिंचवड

उपचार नाकारणा-या निरामय रुग्णालयावर कारवाई करा – इरफान सय्यद

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढला आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे पालिका रुग्णालयातील बेड कमी पडत आहेत. त्यातच सध्याच्या पावसाळ्यात रुग्ण वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्त रुग्णांवरील उपचारासाठी पालिका हद्दीतील सर्व मोठी खासगी रूग्णालये आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत तत्काळ अधिग्रहित करावीत. जेणेकरून रुग्णांचे बेड मिळत नसल्याने होणारे हाल थांबतील. त्यांना मनस्तापाला सामोरे जावे लागणार नाही. तसेच चिंचवड स्टेशन येथील निरामय हाॅस्पिटल या खाजगी रूग्णालयात नागरीकांना प्राथमिक उपचार नाकारले जात आहेत. त्यामुळे या रुग्णालयावर आपत्ती व्यवस्थापन व साथ रोग नियंत्रण कायद्यानुसार त्वरीत कारवाई व्हावी, अशा मागण्या शिवसेना सहसंपर्कप्रमुख, तथा कामगार नेते इरफान सय्यद यांनी जिल्हाधिकारी नवल किशोर राम आणि पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केल्या आहेत.

निवेदनात इरफान सय्यद यांनी म्हटले आहे की, देशात व राज्यात कोरोना व्हायरस या आजाराचे मोठ्या प्रमाणात रूग्ण सापडत आहे. या विषाणुचा पादुर्भाव वाढत आहे. गेल्या तीन महिन्यापासून दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढतच आहे. पुणे जिल्ह्यातील पुणे शहर व पिंपरी-चिंचवडमध्ये मोठ्या प्रमाणावर रूग्ण आहेत. पिंपरीतील रूग्णांची संख्या साडे आठ हजाराच्या उंबरठ्यावर आहे. आता पावसाला सुरुवात झाली आहे. पावसाळी वातावरणामुळे थंडी ताप, खोकला यासारख्या आजाराचे रूग्ण जास्त सापडत असतांना या रूग्णांना प्राथमिक उपचार देण्यासाठी खाजगी हाॅस्पिटल नकार देत आहेत. एखादा रुग्ण रात्री रूग्णालयात गेल्यावर त्याला गेटच्या बाहेर थांबवून थंडी, ताप, खोकला आहे का असे विचारण्यात येते. ताप असेल तर त्याला यशंवतराव चव्हाण स्मृती रूग्णालयात जाण्याचे सांगण्यात येते. सकाळी फिवर ओपडीच्या नावावर पेशंटला न तपासताच यशंवतराव चव्हाण स्मृती रूग्णालयात पाठवण्यात येते. अशा पद्धतीने चिंचवड येथील निरामय या खासगी रूग्णालयात रूग्णाला उपचार देण्यापासून रुग्णालयाची टाळाटाळ सुरु आहे, असेही सय्यद यांनी म्हटले आहे.

आज बुधवारी सकाळी चिखली येथील एक गृहस्थ निरामय या रुग्णालयात अस्वस्थ वाटत असल्याने गेला असता त्याला तेथे प्राथमिक उपचार देण्यास रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट नकार दिला. अशा प्रकारचे कटू अनुभव अनेक रुग्णांना आलेले आहेत. या खासगी रुग्णालयाचे लागेबांधे पालिकेच्या व शासकीय अधिकारी वर्गासोबत असल्याने त्यावर कारवाईपासून पळ काढला जात आहे. त्यामुळे रूग्णांना सेवा देण्याच्या नावाने पैसे कमविणा-या या रूग्णालयला सध्याच्या आत्पकालिन परिस्थितीत मात्र रुग्ण नकोसे झाले आहेत.. ? असा प्रश्न नागरीकांना पडला आहे. महामारीत असे वागणाऱ्या या खासगी रुग्णालयावर त्वरीत कारवाई करण्यात यावी, असेही सय्यद यांनी म्हटले आहे.

महापालिका कोरोनाची परिस्थिती व्यवस्थित हाताळत आहे. कोरोनाशी लढा देण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत. पालिका हद्दीतील रुग्णसंख्या साडे आठ हजाराच्या उंबरठ्यावर आहेत. मोठ्या प्रमाणावर रुग्णांची तपासणी चालू आहे. यातील बहुतांश रूग्णाला उपचारासाठी दाखल करण्यात येत आहे. परंतु, काही दिवसांपासून शहरातील शासकीय रूग्णालयात जागा नसल्याचे दिसून येते.. त्यामुळे अनेक रुग्णांनी खासगी रुग्णालयात जाणे पसंत केले. कोरोनासाठी राखीव असलेल्या रुग्णालयात रूग्णाला उपचारासाठी जागाच उपलब्ध नाही. तसेच अनेक खाजगी रुग्णालये रिकामी असुनसुद्धा कोरोना संशंयित रुग्ण म्हणून या रूग्णांना प्राथमिक उपचार व रुग्णालयात दाखल करून घेण्यापासून पळ काढला जात आहे. मनमानी कारभाराद्वारे शासकीय आदेश धाब्यावर बसवण्याचे षडयंत्र शहरातील काही खाजगी रुग्णालये करीत आहेत. त्यामुळे अशा रुग्णालयांवर जिल्हाधिकाऱ्यांनी व पालिका आयुक्तांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम २५ अन्वये कारवाई करून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा, असे या निवेदनात इरफान सय्यद यांनी म्हटले आहे.

”देशातील अनेक राज्यात व महाराष्ट्रातील अनेक भागात शासनाकडून खाजगी रूग्णालये कोरोना उपचारासाठी अधिग्रहित करून, त्यात विलगीकरण कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. पिंपरी- चिंचवड शहरात नामांकित असे १० रुग्णालये आहेत. ज्यांची खाटाची संख्या १०० च्या जवळपास असुन, अतिदक्षता विभागात १० खाटा व व्हेन्टींलेटर ( कृत्रीम श्वास उपकरण ) व विविध साधनसामग्री उपलब्ध आहेत. शहरातील रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आणि रूग्णाला योग्य उपचार मिळावेत, याकरिता “आपत्ती व्यवस्थापन कायद्यातंर्गत ” शहरातील सर्व खासगी रुग्णालये कोरोनाची स्थिती जोपर्यंत आटोक्यात येत नाही तोपर्यंत जिल्हाधिकारी व पालिका आयुक्तांनी अधिग्रहित करावीत”.

इरफान सय्यद – शिवसेना सहसंपर्कप्रमुख तथा कामगार नेते
Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button