breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

उद्योगनगरीचे महापाैर व उपमहापाैर उद्या ठरणार

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी उद्या (शनिवारी) निवडणूक होणार आहे. सकाळी 11 वाजता महापालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत ही निवड होणार आहे. 

महापौर व उपमहापौर पदासाठी सत्ताधारी भाजपकडून राहुल जाधव व सचिन चिंचवडे आणि विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसकडून अनुक्रमे विनोद नढे व विनया तापकीर यांनी मंगळवारी (दि.31) अर्ज दाखल केले आहेत. महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात विशेष सभा होणार आहे. पीठासीन अधिकारी म्हणून पीएमपीएमएलच्या संचालक नयना गुंडे  कामकाज पाहणार आहेत.

दरम्यान, महापाैर व उपमहापाैर पदासाठी निवडणूकीसाठी आलेल्या अर्जाची माहिती नगरसचिव उल्हास जगताप हे अध्यक्ष गुंडे यांना देतील.  सर्व अर्ज ते अध्यक्षांना सादर करतील. त्यावर ते वैध व अवैध अर्जाची घोषणा करतील. एका पदासाठी एकापेक्षा अधिक अर्ज आल्याने माघारीसाठी 15 मिनिटे वेळ दिला जाणार आहे. अर्ज मागे न घेतल्यास निवडणूक घेतली जाईल. त्यामध्ये उमेदवारांच्या बाजूने प्रत्येक नगरसेवकाला हात वरती करून मत द्यावे लागणार आहे. मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर मते जाहीर करून महापौर व उपमहापौरांची निवड घोषित केली जाईल, अशी माहिती नगरसचिव उल्हास जगताप यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button