Breaking-newsपिंपरी / चिंचवड
उद्या सकाळी अकरा ते दुपारी साडेबारा पर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार
![Water supply](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/11/0water_tap_51.jpg)
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
रावेत येथील पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या जलउपसा केंद्रातील पंपगृहामध्ये दुरूस्ती काम निघाले आहे. त्यामुळे मंगळवारी (दि. 6) सकाळी अकरा ते दुपारी साडेबारा या कालावधीत पाणी उपसा बंद राहणार आहे. दुपारी बारानंतर, सायंकाळी, रात्री व बुधवारी सकाळी पाणी पुरवठा कमी दाबाने सुटणार आहे. दरम्यान, पाणी पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. तरी, जपून पाणी वापरावे, असे आवाहन पाणी पुरवठा विभागाचे सह शहर अभियंता रामदास तांबे यांनी केले आहे.