उच्च न्यायालयाच्या खंडपीठासाठी महापौरांचे मुख्यमंत्र्यांना साकडे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/shutterstock_234552142-e1504004436685.jpg)
पिंपरी – पुण्यासह पिंपरी-चिंचवड आणि लगतच्या भागातील नागरिकांच्या सोयीसाठी मे. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ पुणे किंवा पिंपरी-चिंचवड शहरामध्ये सुरू होण्याची नितांत गरज आहे. त्यासाठी शासन स्तरावर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी महापौर नितीन काळजे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
यासंदर्भात काळजे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि लगतच्या भागातील नागरिकांच्या मागणीनुसार मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ शहरात होण्यासाठी पिंपरी-चिंचवड अॅडव्होकेट्स बार असोसिएशन प्रयत्नशिल आहे. परंतु, त्यांच्या प्रयत्नाला यश येताना दिसत नाही. नागरिकांना दावे निकाली काढण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात फे-या माराव्या लागतात. यातून नागरिकांची सुटका करून त्यांची शहरातच सोय व्हावी, यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ पुणे/पिंपरी-चिंचवड शहरामध्ये होण्यासाठी सरकार स्तरावर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी महापौर काळजे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.