breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

इंधन दर वाढ करून मोदी सरकारने जनतेला महागाईच्या खाईत लोटले – मेहबूब शेख

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे पिंपरीत इंधन दरवाढी विरोधात आंदोलन

‘वारे मोदी तेरा खेल, सोने के भाव मे बिकता तेल’ म्हणत कार्यकर्त्यांचा निषेध

पिंपरी । प्रतिनिधी

आंतरराष्ट्रीय बाजारात इंधन दर कमी असताना भारतात पेट्रोल, डिझेल आणि गॅसची वारंवार भाववाढ का ? असा सवाल राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी उपस्थित केला आहे. त्यात रोजच होणा-या पेट्रोल, डिझेल, गॅसच्या दरवाढीमुळे सामान्य माणसाला महागाईच्या खाईत लोटले जात आहे, अशी टिका शेख यांनी केली.

केंद्र सरकारने केलेल्या इंधन दरवाढी विरोधात महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात ठिय्या आंदोलन करण्यात आले. मेहबूब शेख यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. शैलेश मोहीते, पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, पिंपरी चिंचवड युवक शहराध्यक्ष विशाल वाकडकर, पुणे युवक शहराध्यक्ष महेश हांडे, पुणे जिल्हा युवक शहराध्यक्ष सचिन घोटकुले, प्रदेश युवक सरचिटणीस विशाल काळभोर, संदिप लाला चिंचवडे, प्रदेश उपाध्यक्ष अभिषेक बोके, किशोर मासाळ, अजय आवटी, नगरसेवक पंकज भालेकर, युवती शहराध्यक्षा वर्षा जगताप तसेच प्रदेश युवक आणि शहर युवकचे सर्व पदाधिकारी बहुसंख्य युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मेहबूब शेख म्हणाले की, खोटी आश्वासने देऊन केंद्रात सत्तेवर आलेले भाजपाचे सरकार रोज पेट्रोल, डिझेल व गॅसचे दरवाढ करीत आहेत. नोटाबंदी, जीएसटी, कोरोनाच्या लॉकडाऊन मुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. जागतिक महामारीमुळे उद्योग, व्यवसाय ठप्प झाले होते. नुकतेच अनलॉक प्रक्रिया सुरु झाल्यामुळे हातावर पोट असणा-या नागरीकांचा उद्योग, व्यवसाय सुरु झाला आहे. या वेळी ‘वारे मोदी तेरा खेल, सोने के भाव मे बिकता तेल’ अशा घोषणा देऊन आंदोलनकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button