देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘इंद्रायणी थडीचं’ उद्घाटन- आ.महेश लांडगे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/Untitled-141.png)
पिंपरी चिंचवड | महाईन्यूज |
शिवांजली सखी मंचच्या वतीने ‘इंद्रायणी थडीचे’ आयोजन करण्यात आले आहे. याबाबत माहिती देण्यासाठी भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहासमोरील गावजत्रा मैदान येथे आज मंगळवारी दुपारी 1 वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आलं होत…भाजपा शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांनी सर्व पत्रकारांना निमंत्रणही दिलं होत…
या पत्रकार परिषदेत आमदार महेश लांंडगे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी पुजा लांडगेही उपस्थित होत्या… ‘इंद्रायणी थडी’ 30,31 जानेवारी आणि 1,2 फेब्रुवारी आयोजित करण्यात आली आहे.तसेच ‘इंद्रायणी थडी’ उद्घाटन करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं…
पत्रकार परिषदेत महेश लांडगे यांनी या जत्रेची थीम कशी असणार आहे याबाबत सांगितलं. तसेच या जत्रेत महिलांच्या सक्षमिकरणासोबत स्वत;ची सुरक्षा कशी करावी यासाठी कराटे प्रशिक्षणाचे क्लासेसही ठेवण्यात आले आहेत. तसेच अनेक महाराष्ट्राच्या संस्कृतीचे प्रतिकृती दाकवण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.एवढचं नाही तर, या जत्रेत सहभागी झालेल्या महिलांच्या स्टॉलला प्रतिसाद देऊन या महिलांच्या कष्टाला साथ देण्याचीही महेश लांडगे यांनी सर्वांना आवाहन केलं आहे…