breaking-newsपिंपरी / चिंचवड

इंद्रायणीनगर येथील वैष्णोमाता प्राथमिक शाळेत रुबेरा लसीकरण मोहिम

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – भोसरीतील इंद्रायणीनगर येथील वैष्णोमाता प्राथमिक शाळेमधील विद्यार्थ्यांचे रूबेला-गोवर लसीकरण करण्यात आले. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क प्रभाग समितीच्या अध्यक्षा नम्रता लोंढे, योगेश लोंढे, शाळेच्या मुख्याध्यापिका शैला मातेरे यावेळी उपस्थित होते. त्यावेळी क प्रभाग समितीच्या अध्यक्षा नम्रता लोंढे यांच्या हस्ते लहान बालकांना लस देऊन लसीकरण मोहिमेचे उदघाटन करण्यात आले.

रुबेला व गोवर लसीकरण मोहिमे अंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पालिका व खासगी शाळा, अंगणवाडी, बालवाडी आणि नर्सरीतील सर्व विद्यार्थ्यांचे लसीकरण केले जात आहे. त्यात शहरातील सर्व शाळा टप्पा-टप्प्याने सहभागी होत आहेत.  ही मोहिम 27 नोव्हेंबरला सुरू झाली असून, त्या पुढे ती महिनाभर सुरू राहणार आहे. शहरातील प्रत्येक पालकांनी आपल्या 9 महिने ते 15 वर्षे वयोगटातील सर्व बालक व विद्यार्थ्यांनी ही मोफत लस घ्यावी, असे आवाहन क  प्रभागाच्या अध्यक्षा नम्रता लोंढे यांनी या वेळी केले.

दरम्यान, जानकी देवी बजाज तर्फे घेण्यात आलेल्या  वैयक्तिक व सांघिक स्पर्धेत विद्यार्थाना घवघवित यश मिळाल्या बद्दल त्याना नगरसेविका, क प्रभाग समितीच्या अध्यक्षा नम्रता लोंढे यांच्या हस्ते मेडल देवून गौरवण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button