आळंदी ते राजगुरूनगर पीएमपीएमएल बस सुरू करा
![Start PMPML bus from Alandi to Rajgurunagar](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/मनसे.jpg)
मनसेची पीएमपीएलकडे मागणी
पिंपरी | प्रतिनिधी
खेड तालुक्यातील आळंदी, चाकण आणि राजगुरूनगर या प्रमुख तीन शहरातील नागरिकांचा प्रवास सुलभ होण्यासाठी बस सेवा सुरु करणे गरजेचे आहे. त्यासाठी आळंदी ते राजगुरूनगर अशी पीएमपीएमएल बस सुरू करण्यात यावी, अशी मागणी खेड तालुका मनसे रस्ते आस्थापना आणि साधन सुविधा विभागाचे तालुकाप्रमुख प्रसाद बोराटे यांनी मागणी केली आहे. पीएमपीएलचे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप यांना सविस्तर निवेदन दिले आहे.
अविनाश लोखंडे, निलेश घुंडरे, तुषार नेटके, किरण नरके युवराज चौधरी आदी मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.
या वेळी बोराटे म्हणाले की, आळंदी आणि आसपासच्या सात आठ गावातील नागरिकांना आपले शासकीय कामे, न्यायालयीन कामे, चाकण येथील बाजारासाठी शेतकरी वर्ग आणि चाकण एम.आय.डि.सी मधील कामगार वर्ग यांना प्रवास सोयीस्कर होण्यासाठी आळंदी ते राजगुरूनगर पीएमपील बस सुरू करणे गरजेचे आहे.तसेच संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या समाधी दर्शनासाठी सुध्दा राजगुरूनगर चाकण येथील भाविकांना प्रवास सहज उपलब्ध होऊ शकतो. या सर्व बाबींचा विचार पीएमपीएल प्रशासनाने करून लवकरात लवकर या मार्गावर बस सेवा उपलब्ध करून देण्यात यावी.