breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

“आरटीई’ अर्ज दुरुस्तीसाठी आता शुक्रवारपर्यंत मुदतवाढ

पुणे – बालकांच्या मोफत व सक्‍तीच्या शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) 25 टक्के प्रवेशासाठीच्या अर्जात दुरुस्त्या करण्यासाठी पालकांना 7 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

“आरटीई’ प्रवेशाच्या पहिल्या फेरीसाठी 8 एप्रिल रोजी राज्यस्तरीय लॉटरी काढण्यात आली. यात प्रवेशापात्र पालकांनी पडताळणी समितीकडे कागदपत्रांची तपासणी करुन शाळेत जावून प्रवेश घेतले असून पहिल्या प्रवेश फेरीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. बहुसंख्य पालकांच्या अर्जात चूका झाल्या आहेत. गुगल लोकशन चुकीचे नोंदविले आहेत. यामुळे प्रवेशासाठी संधी मिळू शकली नाही.

प्रवेशाची दुसरी फेरी सुरू करण्यापूर्वी पालकांना अर्जात दुरुस्त्या करण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती. मात्र, अद्यापही काही पालकांना अर्जात दुरुस्ती करता आलेली नाही. या पालकांना दुरुस्तीसाठी आणखी मुदतवाढ मिळावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पुणे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी प्राथमिक शिक्षण विभागाचे संचालक सुनील चौहान यांच्याकडे नुकतीच केली होती. त्याची दखल घेऊन चौहान यांनी मुदतवाढीचा निर्णय जाहिर केला आहे. लॉटरी न लागलेल्या पालकांचे गुगल लोकेशन चुकल्यास ते दुरुस्त करता येणार आहे.

लोकेशन दुरुस्त केल्यानंतर शाळांची निवड नव्याने करणे आवश्‍यक आहे. जन्मतारीख अथवा नावात बदल करता येणार नाहीत. पालकांना पहिल्या फेरीत लॉटरी लागली. परंतु अंतराच्या अडचणीमुळे प्रवेश घेऊ शकले नाही अशाच पालकांच्या तक्रारीची खात्री पडताळणी समितीने करणे व पालकांची चूक किंवा तांत्रिक चूक असल्यास गुगल लोकेशन व शाळा निवडीत दुरुस्ती करावी. काही पालकांनी घराचे अंतर 3 कि.मी.पेक्षा जास्त असताना जाणिवपूर्वक 1 कि.मी.च्या आत दाखविले आहे. पडताळणी समितीने अशांना अपात्र ठरवले असून त्यांची दुरुस्ती करू नये, अशा सूचना चौहान यांनी पडताळणी समितीला दिल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button