breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आयुक्त म्हणतात… अर्थसंकल्प भविष्यवेधी अन्ं वास्तवदर्शी

नवीन प्रकल्पांऐवजी जून्याच प्रकल्पांना मुदतीत पुर्ण करण्याचा निर्धार

पिंपरी |महाईन्यूज|प्रतिनिधी|

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यंदाच्या सन 2020-2021 या अर्थसंकल्पात नवीन प्रकल्पांचा समावेश केलेला नाही. मात्र, महापालिकेने मागील दोन वर्षात हाती घेतलेले प्रकल्प, निधी अभावी कामे थांबू नयेत म्हणून त्याच प्रकल्पांना मोठ्या प्रमाणात तरतूद करुन मुदतीत कामे पुर्ण करण्यात येणार आहेत. त्यामुळे पंतप्रधान आवास योजना, पाणी पुरवठा प्रकल्प, पर्यावरणाचे प्रकल्प, स्थापत्यचे उड्डाणपूल, बीआरटीसह एचसीएमआरटीचा न्युओ मेट्रो प्रकल्प या प्रकल्पांना तरतूद केल्याने नागरिकांना त्याचा लाभ होणार आहे, अशी माहिती आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सन 2020-21 या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक स्थायीकडे सादर झाले. त्यात विकास आराखड्यातील नवीन रस्त्यांना प्राधान्य दिले आहे. ठराविक भागातील विकास कामांना प्राधान्य देण्यासाठी ही तरतूद केल्याचे दिसत आहे. विकास कामासाठी शहरातील सर्वसमावेश भागाचा केंद्रबिंदू ठरविलेला नाही. सन 2020-21 या आर्थिक वर्षांसाठीचा पिंपरी-चिंचवड पालिकेचा मूळ 5 हजार 232 कोटी तर केंद्र सरकारच्या पुरस्कृत योजनांचा समावेश असलेला एकूण 6 हजार 628 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज सोमवारी (दि. 17) स्थायी समितीपुढे सादर केला.

आयुक्त हर्डिकर म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहर हे भविष्यातील सर्वांधिक पसंतीचे जगण्यायोग्य शहर व्हावे, त्यात आर्थिक सुबत्ताही यावी म्हणून प्रयत्नशिल आहोत. शहरातील नागरिक केंद्रस्थानी मानून त्यांचे जीवनमान उंचावणे व शहराचा दर्जा वाढवणे, हेच ध्येय समोर ठेवले आहे. तसेच पाणी पुरवठा ही शहराची वाढती समस्या आहे. समन्यायी पाणी वाटपासाठी नागरिकांच्या अतिरिक्त पाणीवापरावर निर्बंध घालावे लागतील. याकरिता प्रतिदिन पहिल्या 40 लिटर पाण्याचा वापर मोफत करत 135 लिटपवरील जादा दराने आकारणी करण्यात येणार आहे. तर करबुडवे, करचुकवे, अनधिकृत कनेक्शन घेणा-यावर कडक कारवाई केली जाईल.

विकास आराखड्याचे हे शेवटचे वर्ष असल्याने नवीन भागात भुसंपादन, अविकसित भागात रस्त्यांची सुविधा देवून विकास आराखड्यांची अधिकाधिक अमंलबजावणी करण्यात येईल. विकसकांना बांधकामाच्या प्रक्रिया अधिक सुलभ केले जाईल. शहरातील दळण-वळण्याचा सर्वाधिक सुविधा उपलब्ध करणार असून नवीन बसेससाठी 95 कोटीची तरतूद ठेवली आहे. रिंगरोड विकसित करताना न्युओ मेट्रो प्रकल्पास 50 कोटींची तरतूद केली आहे. पाणी पुरवठा आणि पर्यावरण योजनासाठी नवीन कर्जरोख उपलब्ध करण्यास सुमारे 400 कोटी वेगळी तरतूद ठेवल्याचे आयुक्तांनी सांगितले.

तीन वर्षात.. बांधकामात तिप्पटीने उत्पन्न वाढ

पिंपरी चिंचवड शहर निश्चित राहण्यायोग्य शहर बनू लागले आहे. शहरात मागील तीन वर्षात बांधकामातून 10 टक्के उत्पन्न वाढून पालिकेच्या तिजोरीत सुमारे 500 कोटीची भर पडली आहे. हा शहरवाढीचा वेग निश्चितच भविष्यात सर्वांधिक पसंतीचे शहर बनण्यास मदत होणार आहे. बांधकाम विभागाचे 267 कोटीवरुन सन 2018-2019 मध्ये 431.72 कोटी, 2019-2020 मध्ये 667.70 कोटी उत्पन्न झाले आहे. कोणतीही करवाढ न करता तीन वर्षात तीन पटीने उत्पन्न वाढले आहे.

अर्थसंकल्प अभ्यासासाठी स्थायी तहकूब

महापालिकेचा सन 2020-21 या आर्थिक वर्षाचे मूळ 5 हजार 232 कोटी तर केंद्र सरकारच्या पुरस्कृत योजनांचा समावेशाने एकूण 6 हजार 628 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आज (सोमवारी) स्थायीकडे सादर केले. दरम्यान, स्थायी सदस्यांच्या अभ्यासासाठी दहा दिवस देण्यात आले असून हा अर्थसंकल्प 27 फेब्रुवारी दुपारी अडीच वाजेपर्यंत तहकूब ठेवला आहे, असे स्थायीचे सभापती विलास मडेगिरी यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button