breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आयुक्तांच्या ‘एचओडी’ मिटींगला विलंब लावणा-या तिघांना ‘कारणे दाखवा नोटीस’

समाधानकारक खुलासा न आल्यास होणार दंडात्मक कारवाई

पिंपरी |महाईन्यूज|

राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने केलेल्या मार्गदर्शक सुचनेनूसार पिंपरी चिंचवड शहरात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी सर्व विभाग प्रमुखांची आज (सोमवार) समन्वय बैठक घेतली. या बैठकीला तिघेजण उशिरा आले. त्याचा आयुक्तांनी कडक भाषेत समाचार घेवून तत्काळ कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश प्रशासन विभागास दिले. त्यानूसार प्रशासनाने तीन विभाग प्रमुखांना ‘शो काॅज’ बजावून खुलासा करण्यास सांगितले आहे.

महापालिका मुख्य प्रशासकीय भवनामध्ये झालेल्या बैठकीस अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अजित पवार, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डाँ. के. अनिल रॉय, अतिरिक्त आरोग्य अधिकारी डाँ. पवन साळवे, शहर अभियंता राजन पाटील, जिल्हाधिकारी कार्यालयाचे समन्वयक उपजिल्हाधिकारी रेश्मा माळी आदी विभाग प्रमुख बैठकीस उपस्थित होते.

राज्याच्या आरोग्य विभागाने आदेशाने मार्गदर्शक सुचना केल्या आहेत. त्या सुचना व नियमांचे तत्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश आयुक्त श्रावण हर्डिकर यांना दिले. त्यानूसार आयुक्त हर्डिकर यांनी आज करोना विषाणू आजाराच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या सर्व विभागप्रमुखांची समन्वय बैठक घेण्यात आली. करोना संदर्भात केलेल्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. तसेच प्रत्येकाला अन्य कामकाजाच्या नियोजनासंदर्भांत आयुक्तांनी सूचना दिल्या.

दरम्यान, या बैठकीला मुख्य उद्यान अधिक्षक दत्तात्रय गायकवाड, प्राथमिक शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी ज्योत्सा शिंदे, माध्यमिक विभागाचे प्रभारी पराग मुंडे हे उशिरा आले. त्या सर्वांचा आयुक्तांनी कडक भाषेत समाचार घेतला. तसेच प्रशासन विभागाला संबंधिताना कारणे दाखवा नोटीस बजावून खुलासा मागवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संबंधितानी समाधानकारक खुलासा न केल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई करुन सेवा पुस्तकांत नोंद करण्याचे निर्देश दिले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button