आयुक्तसाहेब प्रभाग 21 प्राणीसंग्रहालय म्हणून घोषीत करा; संदीप वाघेरे यांची उरोधिक मागणी
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – महापालिकेचा प्रभाग क्रमांक 21 पिंपरीमध्ये मोकाट जनावरांचा सुळसुळाट वाडला आहे. या जनावरांचा महापालिका बंदोबस्त करत नसल्यामुळे भाजपचे नगरसेवक संदीप वाघेरे यांनी हा प्रभाग प्राणीसंग्रहालय म्हणून घोषीत करावा, अशी उपरोधिक मागणी नगरसेवक वाघेरे यांनी केली आहे.
यासंदर्भात वाघेरे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हार्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, प्रभाग क्रमांक 21 मध्ये कुत्रे, गाई अशा मोकाट जनावरांची संख्या वाढली आहे. नागरिकांना त्यांच्यापासून नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कुत्र्यांमुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. लहान मुले असतील किंवा ज्येष्ठ नागरिक यांना चावा घेण्याचा धोका वाढला आहे. या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी अनेकदा केली. मात्र, महापालिका स्तरावर त्यासाठी पाऊल उचलले नाही. आयुक्तांची इच्छाशक्ती नसेल तर प्रभाग 21 हा प्राणीसंग्रहालय म्हणून घोषीत करावा, अशी उपरोधीक मागणी वाघेरे यांनी केली आहे.