breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आयुक्तसाहेब..नुसत्या बैठकांचा खेळ लावू नका; कोरोना संसर्ग रोखण्यास ठोस उपाययोजना करा – महापाैरांचे आदेश

नागरिकांचे आरोग्य उत्तम आणि निरोगी ठेवण्याची जबाबदारी पालिकेची, संसर्गाबाबत जनजागृती सर्वेक्षण करा

पिंपरी |महाईन्यूज|

पिंपरी चिंचवड शहराचे आरोग्य उत्तम आणि निरोगी राखण्याची जबाबदारी महापालिका प्रशासनाची आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने कोरोना विषाणू संसर्गाबाबत जनजागृती आणि सर्वेक्षण करा, संशयित रुग्णांच्या परिसरात औषध फवारणी तात्काळ करा. असा आदेश महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी आज आयुक्त श्रावण हर्डिकर यांना दिला.

कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाद्वारे करण्यात येणा-या विविध उपाययोजनांचा आढावा आणि यापुढे कोणत्या गोष्टींचे नियोजन करावे लागेल याबाबत सविस्तर चर्चा आज महापौर ढोरे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर आणि संबंधित अधिका-यांशी केली. यावेळी उपमहापौर तुषार हिंगे, पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, विरोधी पक्षनेते नाना काटे, शिवसेना गटनेते राहूल कलाटे, मनसे गटनेते सचिन चिखले, अपक्ष आघाडी गटनेते कैलास बारणे, नगरसेवक राजेंद्र गावडे, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अजित पवार, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के अनिल रॉय, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे आदी उपस्थित होते.

कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी शहरात नेमके कोणकोणत्या भागात सर्वेक्षण केले, निर्जंतुकीकरण केले, फवारणी केली याची माहिती महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी घेतली. जलद प्रतिसाद पथकांचे कामकाज अधिक प्रभावीपणे करण्यासाठी त्यांनी सूचना दिल्या. सोसायटीमधील चेअरमन आणि इतर रहिवासी यांना विश्वासात घेऊन त्यांचीही मदत घ्यावी असे त्या म्हणाल्या. आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जात असताना सामूहीक प्रयत्नांची गरज असते त्यामुळे उत्तम समन्वय ठेवून प्रशासनाने प्रभावीपणे कामकाज करावे. कोणत्याही स्वरूपाची आर्थिक गरज पडल्यास आयुक्तांनी तात्काळ कार्यवाही करून योग्य नियोजन करावे अशी सूचना आयुक्तांना महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केली.

शहरात ज्याठिकाणी गर्दीचे कार्यक्रम होत आहेत ते तात्काळ बंद करण्यासंदर्भात प्रशासनाने पावले
उचलावीत, होम क्वारंटाईन केलेल्या व्यक्ती तथा परिवाराला सोसायटीतील रहिवाश्यांनी सहकार्य करावे अशा स्वरूपाचे पत्र महापालिकेने सोसायटी धारकांना द्यावे जेणेकरून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही. आपत्कालीन परिस्थितीत विलगीकरण अतिदक्षता कक्ष कमी पडत असल्यास तात्काळ त्यांची उभारणी करावी अशा सूचना पदाधिका-यांनी केल्या. नागरिकांनी कोरोना विषाणू संदर्भात कोणत्याही प्रकारच्या अफवांना बळी पडू नये तसेच घाबरून जाऊ नये, महापालिकेने वेळोवेळी केलेल्या आरोग्य विषयक सूचनांची अंमलबजावणी करावी आणि आपल्या आरोग्याची
काळजी घ्यावी असे आवाहन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button