breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

आमदार लक्ष्मण जगतापांनी पिंपरी-चिंचवडची वाट लावली – खासदार बारणेंचा आरोप

चौदा वर्षात चौदा वेळाही विधानसभेत आमदारांनी  ‘तोंड’ उघडले नाही

पिंपरी ( महा ई न्यूज ) – विधानसभेत ‘तोंड’ न उघलेले मौनी आमदार असलेल्या लक्ष्मण जगताप यांनी पिंपरी-चिंचवड शहराची वाट लावली आहे. राष्ट्रवादीच्या कारभाराला कंटाळलेल्या जनतेने भाजपच्या हातात सत्ता दिली. परंतु, सत्तेची चटक लागलेल्या जगतापांनी पालिकेत अनागोंदी कारभार सुरु केला आहे. दीड वर्षाच्या कारभाराला जनता कंटाळली असून जगतापाचा ‘ताप’  पिंपरी-चिंचवडकरांना होतोय. शहरात पाणी, कचरा, वाढती गुन्हेगारी या समस्यांना सर्वस्वी जबाबदार आमदार लक्ष्मण जगतापच असल्याचा गंभीर आरोप शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केला आहे.

खासदार बारणे यांनी काढलेल्या प्रसिध्दपत्रकांत म्हटले आहे की,  2014 च्या लोकसभा निवडणुकीचा पराभव जगताप यांच्या जिव्हारी लागला आहे. आपण पुन्हा राष्ट्रवादी पक्षात आमदार होणार नाही हे त्यांना पुरते कळून चुकल्याने ते मोदी लाटेत भाजपवाशी झाले. राष्ट्रवादी पक्षाच्या कारभारावर नाराज असलेल्या पिंपरी-चिंचवडच्या जनतेला बदल हवा म्हणून भाजपला सत्ता दिली. समाजवादी कॉंग्रेस, काँग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, मनसेचा सहारा घेऊन भाजपावाशी झालेल्या या आमदारांना वाटते की हि सत्ता आपल्यामुळेच मिळाली आहे.

एकेकाळी देशात अग्रगण्य असलेले पिंपरी-चिंचवड शहर दिशाहीन कर्तुत्वाने शेवटच्या क्रमांकवर फेकले आहे. पिंपरी-चिंचवड शहराचा स्मार्ट सिटीत समावेश होऊन ही कचरा, पाणी, रस्त्यावरील अतिक्रमण व वाहतूक समस्यामुळे शहरातील नागरिक पुरते हैराण झाले आहेत. महापालिकेतील अनागोंदी कारभार एका मागून एक भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर येत आहेत. संगनमत करून निविदा भरणे, मर्जीतील ठेकेदारांना काम देणे, अधिका-यांना दमदाटी करणे, शिव्या देवून धमकावणे हे प्रकार सर्रास चालू आहेत.

शहरातील वाढत्या गुन्हेगारीचे खरे  प्रणेते हेच आमदार आहेत.  त्यांना मी केलेले काम दिसणार नाही. त्यांनी भ्रष्टाराची पट्टी डोळ्यावर आेढली आहे. त्यांच्याकडून चांगल्या कामाची आशा पिंपरी-चिंचवडकरांनी बाळगू नये, त्यांनी विधान सभेत कधीही तोंड उघले नाही. मात्र दुस-यावर टीका करुन त्यांना आनंद मिळत असल्याचे खासदार बारणे यांनीही दिलेल्या प्रसिद्धीस पत्रकात म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button