breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आमदार महेश लांडगे यांचे ‘हौसले बुलंद’; बंधू सचिन लांडगे टाटा मोटर्सच्या अध्यक्षपदी ! 

– आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कामगार समर्थकांची फौज सज्ज
– ‘टाटा मोटर्स’च्या सुमारे साडेसहा हजार कामगारांचे करणार नेतृत्व
पिंपरी | महाईन्यूज |  आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भोसरीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच आमदार महेश लांडगे यांचे बंधू आणि कामगार नेते सचिन लांडगे यांची टाटा मोटर्स कामगार युनियनच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्याचा फायदा निवडणुकीत होणार आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच आमदार लांडगे यांचे ‘हौसले बुलंद’ दिसत आहेत.
टाटा मोटर्स कामगार युनियनची निवडणूक शुक्रवारी पार पडली. गेल्या अनेक वर्षांपासून सचिन लांडगे कंपनीतील कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी काम करायला सुरुवात केली होती. त्यामुळेच युनियनमध्ये प्रथम कामगार प्रतिनिधी म्हणून निवडून आले. त्यानंतर युनियनचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे. कामगारांना कंपणीबाहेरही कौटुंबिक अडचणीत धावून जाणारा कामगार नेता म्हणून सचिन लांडगे यांनी आपली ओळख निर्माण केली. दरम्यान, २०१९ ते २०२२ या कार्यकाळासाठी युनियनच्या निवडणुकीत सचिन लांडगे यांनी अध्यक्षपदी विजय मिळवला आहे.
कामगार लॉबी आमदार लांडगे यांच्या पाठीशी !
भोसरी विधानसभा मतदार संघात कामगार मतदारांची संख्या मोठी आहे. त्यातच टाटा मोटर्स या नामांकीत कंपनीतील सर्वाधिक कामगार हे भोसरी आणि परिसरात राहतात. टाटासह अन्य कंपनीतील कामगार आणि व्यवस्थापण यांच्यात सकारात्मक समन्वय ठेवून आमदार लांडगे आणि कामगार नेते सचिन लांडगे यांनी कामगारांचे अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. त्यामुळे भोसरीतील बहुसंख्य कामगार वर्ग आमदार लांडगे यांच्या पाठीशी असल्याचे दिसते. त्यातच आता अध्यक्षपदी काम करण्याची संधी मिळाल्यामुळे आगामी निवडणुकीत आमदार लांडगे आघाडीवर राहतील, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.
महापालिका निवडणुकीतील ‘त्या’ पराभवाची सल आणि निर्धार !
महापालिका निवडणुकीत भोसरी विधानसभा क्षेत्रात भाजपने दैदीप्यमान यश मिळवले. पण, आमदार महेश लांडगे यांचे बंधू सचिन लांडगे यांना निकराच्या लढाईत पराभव पत्करावा लागला होता. त्यावेळी भोसरीत ‘भाजपचा गड आला; पण सिंह गेला’ अशी समीक्षा करण्यात आली. हा पराभव लांडगे यांच्या जिव्हारी लागला होता. त्या पराभवातून खचून न जाता. सचिन लांडगे यांनी कामगारांसाठी जोमाने काम करायला सुरुवात केली. आमदार लांडगे यांच्या पाठीशी कामगारांची मोठी ताकद उभा करण्याचा आणि आगामी निवडणुकीत ‘त्या’ पराभवाचा वचपा काढण्याचा निर्धार कामगार नेते सचिन लांडगे यांनी केला आहे.
Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button