breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आमदारांना शास्तीची ‘धास्ती’ तर भाजप आणि विरोधकांत राजकीय ‘कुस्ती’

  • शास्ती कराचा प्रश्न राहणार प्रलंबित
  • शहरातले राजकीय वातावरण तापणार

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – शास्ती कराचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरवासियांना पंधरा दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. तो येत्या गुरूवारी (दि. 31) संपुष्टात येत आहे. तरी, आजअखेर शास्ती कराचा प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने मंत्रीमंडळात साधी चर्चा देखील झालेली नाही. त्यामुळे शहरातील विरोधक सत्ताधारी भाजपाला ताळ्यावर आणण्यासाठी एकत्र आले आहेत. त्यांच्याकडून भाजपाच्या विरोधात शहरात जोरदार आंदोलन पुकारण्यात येणार असल्याचे दिसत आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे उद्घाटन आणि शहरांतर्गत रस्त्यांच्या कामांचे भूमीपूजन मुख्यमंत्री फडणवीस यांनी संगणकीय कळ दाबून केले. त्यावेळी चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात जाहीर सभेत आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांनी शास्तीची धास्ती बसल्याची कबुली दिली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतः शास्तीचा किचकट मुद्दा येत्या पंधरा दिवसांत धसास लावण्याचा शब्द दिला. त्याला येत्या गुरूवारी पंधरा दिवस पूर्ण होतात. मुख्यमंत्र्यांचा शब्द किती खरा, आणि किती खोटा, हे पाहण्यासाठी राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे या प्रमुख पक्षांसह विरोधी गटातील सामाजिक संस्था, संघटनांच्या पदाधिका-यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेसमोर काऊंटडाऊनचा फलक लावला.

तो फलकही चोरीला गेल्याने पुन्हा विरोधकांनी एकवटून मुख्यमंत्र्यांच्या फोटोला गाजराचा हार घालून महापालिकेच्या समोर निषेध सभा घेतली. यापूर्वी अनधिकृत बांधकाम आणि शास्ती कराच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन फोल ठरल्याचा आरोप विरोधकांनी केला. त्यामुळे शास्ती कराचा प्रश्न सोडविण्याचे दिलेले आश्वासन किती पाळले जाते, हे पाहण्यासाठी विरोधक एकवटले आहेत. त्यामुळे शहरातील राजकीय वातावरण तापविण्याचा विरोधकांनी सत्ताधारी भाजपच्या विरोधात नियोजनपूर्वक कार्यक्रम आखला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button