breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
आमच्या प्रभागातील विकास कामांमध्ये ‘भाजपा’ने लुडबूड करु नये – राहूल कलाटे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/images.jpg)
पिंपरी – महानगरपालिकेचे महापाैर हे शहराचे प्रथम नागरिक आहेत. सत्ता भाजपची अाहे म्हणून ते एका पक्षाशी केंद्रित होत नाहीत. त्यामुळे महापाैर नितीन काळजे यांनी आमच्या प्रभागातील केलेले विकास कामांचे उद्घाटन हे चारही नगरसेवकांच्या सहमतीने केले आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपच्या आमदारांसह महापालिका पदाधिका-यांनी आमच्या प्रभागातील विकास कामांत लुडबूड करु नये, अशी खरमरीत टिका शिवसेनेचे गटनेते राहूल कलाटे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. यावेळी नगरसेवक अमित गावडे उपस्थित होते.
चिंचवड विधानसभा मतदार संघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांना अंधारात ठेवून रस्त्याच्या भूमिपुजन कार्यक्रम घेण्यात आला. महापालिकेच्या रस्त्याचे शहराचे प्रथम नागरिक असलेल्या महापौरांनी भूमीपूजन केले. त्या कामांवरुन सत्ताधारी भाजपच्या पक्षातंर्गत वाद चव्हाट्यावर आला. त्यामुळे शहराध्यक्षांनी भाजप पदाधिका-यांवर कडक शब्दात ताशेरे आेढले. त्यामुळे महापालिकेतील स्थायी समितीने बुधवारी (दि.30) रोजी माहिती व जनसंपर्क विभागातील अधिका-यावर संताप व्यक्त करुन संबंधिताची चाैकशी करण्याचा ठराव केला.
महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 25 मध्ये शिवसेनेचे गटनेते राहूल कलाटे यांनी महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते रस्त्याचे भूमीपूजन केले. त्यामुळे आमदार जगताप यांना हा प्रकार चांगलाच झोंबल्याचे समोर आले आहे. त्यांच्यासह त्यांच्या समर्थकांमध्ये महापौरांविषयी प्रचंड रोष निर्माण झाला आहे. परंतु, महापौर नितीन काळजे यांच्यावर राग व्यक्त करता येत नसल्याने जगताप यांच्यासह त्यांच्या समर्थकांची अवस्था आपलेच दात अन आपलेच ओठ अशी झाली आहे. त्यामुळे त्यांनी माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रशासन अधिकारी अण्णा बोदडे यांना ‘टार्गेट’ केले आहे.
दरम्यान, प्रभागातील चारही नगरसेवकांच्या मान्यतेने रस्त्याचे भूमिपुजन आम्ही केले आहे. सत्ताधारी भाजपाने शहरात केवळ आम्हीच विकास कामे करतोय, असे भासवू नये, तसेच भाजपाने महापाैरांसह महापालिकेच्या अधिका-यांना टार्गेट केले. आमच्या प्रभागात आम्हीच विकास कामांचे उद्घाटने केली, म्हणून भाजपच्या आमच्या आमदारांना पोटशूळ उठायचे काहीच कामे नाही. त्यामुळे सत्ताधारी भाजप पदाधिकारी व आमदारांनी महापालिकेला स्वतःची जहागिरी समजू नये, अशा शब्दांत राहूल कलाटे यांनी भाजपचा समाचार घेतला आहे.