breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

आदीवासी समाजाबरोबर फराळ व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून दिवाळी साजरी

पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी ।

चिंचवड येथील स्वायत्ता श्रमिक महिला प्रतिष्ठानच्यावतीने फाळणे (मावळ) गावात कातकर व ठकार आदीवासी समाजातील महिला व मुलांसमवेत अनोखी दिवाळी चिंचवड येथील स्वायत्ता श्रमिक महिला प्रतिष्ठानच्यावतीने साजरी करण्यात आली. यावेळी प्रतिष्ठानच्या अध्यक्षा निर्मला जगताप, अंजली ब्रह्मे, किर्ती नाईक, सुरेखा वाडेकर, जयश्री वीरकर, कांचन राजकर, अनिता धाकरस, उदय वाडेकर, अशोक वाडेकर यांच्यासमवेत लाडू, चिवडा, चकली, फराळाचे व जीवनावश्यक वस्तू तसेच फटाके व कपडे देवून एक अनोखी दिवाळी साजरी केली.
फाळणे (मावळ) टाकळी बु, येथील रहिवासी ठकार समाजाच्या शांता आजी यांनी आपले आजवरच्या उभ्या आयुष्यातील पाच पिढ्या पाहिल्या असून त्यांना 35 मुले-मुली आहे. त्याच वाडीतील शांताबाईंनी गावात लाईट, पाणी, आधारकार्ड, रेशनकार्ड, जन्म-मृत्यू नोंद अशा अनेक सुविधा ललित काकडे व शशिकांत आल्हाट यांच्यामार्फत गावामध्ये राबविल्या. ज्योत्स्ना गाजरे गावात येवून मुलांना योग्यरित्या शिक्षण देण्याचे अनोखे काम राबवितात. शाळेच्या मुलांनी वारली पेंटींग व गाणी गावून स्वायत्ता श्रमिक महिला प्रतिष्ठानच्यावतीने एक अनोखी दिवाळी साजरी केली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button