Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आदित्य बिर्ला रुग्णालयाची अतिरिक्त आयुक्तांकडून तपासणी

शासनाच्या मार्गदर्शक सुचनांचे उल्लंघन; कोविड-19 रुग्णांच्या बिलांची होणार तपासणी

पिंपरी|महाईन्यूज|प्रतिनिधी|

पिंपरी चिंचवड शहरातील खाजगी रुग्णालये कोविड-19 रुग्णांकडून अतिरिक्त शुल्क आणि बेड उपलब्ध नसल्याचे सांगून उपचारास नाकारत होते. त्यामुळे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांनी थेरगांव येथील आदित्य बिर्ला मेमोरियल हाॅस्पीटल अचानक भेट देवून तपासणी केली. त्यावेळी रुग्णालय व्यवस्थापनाकडून शासनाच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आले. तेथील कोविड रुग्णांकडून आकारण्यात येणा-यांची बिलांची देखील तपासणी करण्याचे निर्देश संबंधित अधिका-यांना दिले.

आदित्य बिर्ला रुग्णालयाची तपासणीस महापालिकेचे पक्षनेते नामदेव ढाके, उपमहापाैर तुषार हिंगे, नगरसेवक सचिन चिंचवडे, अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डाॅ. पवन साळवे यांच्यासह महापालिकेचे तपासणी पथकांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड शहरातील खाजगी रुग्णालये कोविड-19 रुग्णांला बेड उपलब्ध नसल्याची कारणे सांगून उपचार नाकारत आहेत. तसेच काही रुग्णांकडून अतिरिक्त शुल्क आकारले जावू लागल्याच्या तक्रारी महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांच्याकडे येवू लागल्या आहेत. त्यानूसार महापालिकेने खाजगी रुग्णालयातील बेड तपासणी, रुग्ण तपासणी, बिलांची तपासणी करण्यासाठी पंधरा जणांचे स्वतंत्र टीम तयार केली आहे. त्या टीमचे प्रमुख मुख्य लेखा परिक्षक अमोद कुंभोजकर, सहायक म्हणून मनोज सेठिया यांची नियुक्ती केलेली आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोना रुग्णांची वाढ होत आहे. आजअखेर शहरातील एकूण कोरोना रुग्ण संख्येने १० हजारांचा आकडा पार केला आहे. त्यातील अॅक्टिव्ह रुग्णसंख्या साडेतीन हजारांपेक्षा जास्त आहे. कोरोना होणाऱ्या प्रत्येक रुग्णाला महापालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये उपचार करणे शक्य नाही. त्यामुळे सरकारने आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कोरोना रुग्णांवरील उपचारांसाठी खासगी रुग्णालये ताब्यात घेण्याची मुभा त्या-त्या स्थानिक स्वराज्य संस्थांना दिली आहे. तसेच खासगी रुग्णालयांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या एकूण बेडपैकी ८० टक्के बेड कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी ठेवणे कायद्याने बंधनकारक करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे कोरोना आजार तसेच अन्य आजारांवर किती उपचार खर्च आकारायचे याचे दरही सरकारने निश्चित करून दिले आहेत.

महापालिकेच्या मुख्य लेखापरिक्षक विभागाकडून शहरातील 76 रुग्णालयाची तपासणी करण्यात आलीय. त्या रुग्णालयात शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे पालन होतेय का?, रुग्णांकडून अतिरिक्त शुल्क आकारणी केलीय जातेय का? त्याशिवाय महात्मा फुले आरोग्य जीवनदायी योजना, केंद्राची आयुष्यमान भारत योजनेतून कोविड-19 रुग्णांवर मोफत उपचार केले जातात का? याबाबत तपासणी केली जाणार आहे.

दरम्यान, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांनी आदित्य बिर्ला हाॅस्पीटलची आज तपासणी केली असता. तेथे शासनाच्या मार्गदर्शक सुचनांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले. बाहेर कुठेही रुग्णांवरील उपचाराबाबत खर्च, शिल्लक बेड संख्या, एकूण रुग्ण याविषयी फलक लावले नाहीत. कोविड रुग्णांवरील खर्चाचे शासनाकडून दिलेल्या नोटीफिकेशननूसार बिले आकारलीत का? याविषयी तेथील रुग्णांची बिले ताब्यात घेण्यात आलेली आहेत. त्यामुळे आदित्य बिर्लासह अन्य खाजगी रुग्णांलयाची कडक तपासणी करण्याचे निर्देशही अतिरिक्त आयुक्तांनी दिलेले आहेत.

खाजगी रुग्णालयांचा डॅशबोर्ड तयार

महापालिकेने कोरोनासाठी वॉररुम तयार केली आहे. या वॉररुममध्ये डॅशबोर्ड तयार करून दररोज कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी अपडेट केली जातेय. याच डॅशबोर्डवर आता खासगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेले एकूण बेड, किती बेड कोरोना रुग्णांसाठी देण्यात आले आहेत. रुग्णालयात किती बेड शिल्लक आहेत याची माहिती अपडेट करण्यास महापालिकेने सुरूवात केली आहे. महापालिकेच्या डॅशबोर्डमधील “बेड व्हॅकन्सी” या कॉलममध्ये शहरातील सर्व खासगी रुग्णालयांची नावे आणि तेथे उपलब्ध असलेल्या बेडची माहिती उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच संबंधित रुग्णालयांचे दूरध्वनी क्रमांक डॅशबोर्डवर अपडेट करण्याचे काम महापालिकेकडून सुरू आहे. दररोज सकाळी ११ वाजता आणि सायंकाळी ६ वाजता उपलब्ध बेडची माहिती डॅशबोर्डवर अपडेट केली जाणार आहे. 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button