breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
आता पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांचा वैद्यकीय विमा उतरणार
पिंपरी (महा ई न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांचा वैद्यकीय विमा उतरविण्यात यावा, त्यासाठी वार्षिक अंदाजपत्रकात पुरेशी तरतूद करण्याची सूचना महापौर राहूल जाधव यांनी आयुक्त श्रावण हार्डीकर यांना केली आहे.
यासंदर्भात महापौर जाधव यांनी आयुक्त हार्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, महापालिकेच्या शाळेत सर्वसामान्य कुटुंबातील मुले शिकतात. विद्यार्थी अचानक अजारी पडल्यास, त्यांच्यावर शस्त्रक्रिया करावी लागल्यास संबंधित कुटुंबियांना उपचाराचा खर्च परवडणारा नसतो. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांचा वैद्यकीय विमा उतरविण्यात यावा. त्यासाठी महापालिकेच्या वार्षिक अंदाजपत्रकात पुरेशी आर्थिक तरतूद करण्यात यावी, अशी सूचना महापौर जाधव यांनी निवेदनाद्वारे केली आहे.