breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमुंबई

आता ‘त्या’ रुग्णांना मिळणार मोफत रक्त पिशव्या

राज्य शासनाचा अध्यादेश जारी; रुग्णांची गैरसोय टळणार

प्रदीप लोखंडे

पिंपरी | प्रतिनिधी

राज्य सरकारकडून आता गरजू रुग्णांना मोफत रक्त पिशव्या व रक्त घटक दिल्या जाणार आहेत. सार्वजनिक आरोग्य विभाग, तसेच वैद्यकीय शिक्षण तसेच औषधे द्रव्ये विभागाच्या वैद्यकीय महाविद्यालय सलंग्न शासकीय  रुग्णालयातील रुग्णांसाठी शासनाने हि सोय केली आहे. २०२० – २१ या वर्षासाठी ही योजना राबवलेली असून त्यासाठी येणारा खर्च देखील राज्य शासनाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत मिळणाऱ्या निधीतून भागविण्यात येणार आहे. राज्य शासनाने नुकताच त्याबाबत अध्यादेश जारी केला आहे.

कोरोनामुळे राज्यात रक्ताचा तुटवडा भासत होता. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही या बाबत माहिती देत खंत व्यक्त केली होती. आठवडाभर पुरेल एवढाच रक्तसाठा असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यानुसार विविध सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन रक्तदानाचे उपक्रम घ्यावे, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले होते. सध्या कोरोनाची रुग्ण संख्या कमी झाल्याचे चित्र आहे. तसेच रक्त पिशव्यांना असणारी मागणीही कमी असल्याचे चित्र आहे. तर राज्य शासनाने आता एक अध्यादेश जारी केला आहे. त्यामध्ये गरजू रुग्णांना मोफतच रक्त पिशव्या व रक्त घटक देण्याची सुविधा देणार असल्याचे मूड केले आहे. त्यामुळे रुग्णांना दिलासा मिळणार आहे.

राज्यात सार्वजनिक आरोग्य विभागात एकूण १४ रक्तपेढ्या कार्यरत आहेत. या रक्तपेढ्यांमार्फत प्रतिवर्षी १.५ लाख रक्त पिशव्या संकलित करून गरजू रुग्णांना पुरवठा करण्यात येतो. शासनाने २७ एप्रिल २०१५ रोजी रक्त पिशव्यांचे सेवा शुल्क दर निश्चित केले आहेत. सध्या कोविडच्या महामारीमुळे रक्त पिशव्यांची मागणी वाढली आहे. त्यानुसार होणारा पुरवठा अपुरा पडत होता. रुग्णांची गैरसोय होत होती. त्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने मोफत रक्त पिशव्या गरजू रुग्णांना देण्याचा निर्णय घेतला.  सार्वजनिक आरोग्य विभाग, तसेच वैद्यकीय शिक्षण तसेच औषधे द्रव्ये विभागाच्या वैद्यकीय महाविद्यालय सलंग्न शासकीय  रुग्णालयातील रुग्णांसाठीचं ही सोय करण्यात आली आहे.

राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे उपसचिव किरण वाहूल यांनी या बाबत अध्याधेश जारी केला आहे. त्यामुळे रुगानांची गैरसोय दूर होणार असल्याचे चित्र आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button