Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे
आग्या मोहोळाच्या हल्ल्यात शेतक-यांचा मृत्यू ; वडगाव मावळातील घटना
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/whatsapp-image-2018-06-24-at-5.05.30-pm_20180699274.jpeg)
पिंपरी – आग्या मोहोळाच्या माशांनी केलेल्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना वडगाव मावळच्या कोंडीवडे गावात घडली.
ज्ञानोबा बारकू लागमण (वय ५०) असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. लागमण हे शेतात मशागतीचे काम करत असताना माशांनी त्याच्यावर अचानक हल्ला केला. त्यांच्या चेहरयावर, मानेवर यासह शरीरावर ठिकठिकाणी माशांनी चावा घेतला. ते मोठमोठ्यांनी ओरडू लागले. त्यावेळी शेतात काम करणारे त्यांचे भाऊ चिंधू व विलास त्याठिकाणी आले. त्यांनी माशा हकलण्याचा प्रयत्न केला. पण त्या गेल्या नाहीत. माशांचा हल्ला सुरुच होता. काही वेळानंतर लागमण यांना जखमी अवस्थेत त्यांना रूग्णालयात दाखल करण्या आले. मात्र, उपचारदरम्यान त्यांचा मृत्यू झाला.