breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मनसेची शहर कार्यकारिणी जाहीर

शहराध्यक्ष तथा नगरसेवक सचिन चिखले यांची माहिती

पिंपरी – आगामी विधानसभा निवडणुकीला ताकदीने सामोरे जाण्यासाठी मनसेचे इंजिन वेगाने धावू लागले आहे. पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदार संघाला डोळ्यासमोर ठेवून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पिंपरी-चिंचवड शहर मनसेची कार्यकारिणी आज बुधवारी (दि. 23) जाहिर केली आहे.

मनसेचे पिंपरी-चिंचवड शहराचे नेतृत्व आजपर्यंत दोन अध्यक्षांच्या हाती होते. त्यांच्याशी संपर्क ठेवण्यावरून पक्षांतर्गत समजगैरसमज निर्माण होत होते. त्यामुळे पक्षाध्यक्ष ठाकरे यांनी पक्षाचे विद्यमान नगरसेवक सचिन चिखले यांच्याकडे शहराध्यक्षपदाची एकहाती धुरा सोपविली आहे. त्यामुळे काहीजण नाराज तर काहींजणांना खुशी झाली आहे. चिखले यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदार संघावर पकड निर्माण करण्यासाठी शहर कार्यकारिणी जाहिर केली आहे.

अंकुश तापकीर यांची उपशहराध्यक्ष (भोसरी विधानसभा), राजू साळवे यांची चिंचवड विधानसभा तर बाळा दानवले यांची पिंपरी विधानसभेच्या उपशहराध्यक्षपदी निवड झाली आहे. विशाल मानकरी यांची भोसरी विधानसभा विभाग अध्यक्षपदी निवड झाली आहे. मयुर चिंचवडे आणि शाम जगताप यांची चिंचवड विधानसभा विभाग अध्यक्षपदी निवड झाली आहे. संजय यादव आणि दत्ता देवतरासे यांची पिंपरी विधानसभेच्या विभाग अध्यक्ष पदी निवड झाली आहे. रुपेश पटेकर यांच्यावर शहर सचिव पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. निवड केलेल्या सर्व पदाधिका-यांना मनसेच्या प्रदेश सरचिटणीस रेखा गुप्ता यांनी निवडपत्र दिले आहे. यावेळी मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले, विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष हेमंत डांगे, उपाध्यक्ष बाळा दानवडे आणि रुपेश पटेकर उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button