आकुर्डीतील खासगी शाळेविरोधात पालकांचा एल्गार
![Elgar of parents against private school in Akurdi](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/शाळा.jpg)
फक्त शैक्षणिक शुल्क घ्या; पालकांची मागणी
पिंपरी | प्रतिनिधी
आकुर्डीतील एका खासगी शाळेविरोधात पालकांची आंदोलन करत एल्गार पुकारला. फी मध्ये सवलत द्यावी आणि फक्त शैक्षणिक शुल्क आकारावे या मागणीसाठी शाळेसमोर आंदोलन केले. शाळेच्या पालकांनी जून महिन्यापासूनच फी मध्ये सवलत देण्याची मागणी केली होती. मात्र, ऐन डिसेंबरच्या शेवटी दोन टप्प्यात फी भरा म्हणजे सवलत देतो असे म्हणून शाळा प्रशासन पालकांची आर्थिक कोंडी करत आहे, असे पालकांचे म्हणणे आहे.
या साथीच्या परिस्थितीत बर्याच पालकांनी एकतर नोकरी गमावली आहे किंवा अर्धा पगार मिळत आहे. सध्या ऑनलाईन शिक्षण सुरु असल्यामुळे फक्त शैक्षणिक शुल्क घ्या, इतर अॅक्टिव्हिटीज नको. तसेच विद्यार्थी शाळेच्या आवारात आणि शाळेने पुरविलेल्या इतर सुविधांचा वापर करीत नाहीत. म्हणून पालकांकडून यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येवू नये, अशी विनवणी पालक शाळा प्रशासनाकडे केली.
शिक्षकांनी विद्यार्थी व पालकांशी फी विषयी थेट बोलणे थांबवले आहे. शिक्षकांना फी वसुलीचे एजंट करता येणार नाही. शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी फक्त शिक्षणावर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि त्याबद्दलच चर्चा केली पाहिजे, असे पालकांचे म्हणणे आहे.