breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आकुर्डीच्या डी. वाय. पाटील महाविद्यालयावर दंडात्मक कारवाई

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

आकुर्डीच्या डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयाच्या आवारात साचलेल्या डबक्यात डेंग्यू सदृश्य डास उत्पत्ती होत असल्याचे आढळून आले. अनेक ठिकाणी डेंगूच्या अळ्या सापडल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाने महाविद्यालयाला पाच हजार रूपयांचा दंड बजावला आहे, अशी माहिती पालिकेने कळविली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत आकुर्डी येथे रेल्वे स्टेशनजवळ डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालय आहे. महाविद्यालयाच्या परिसरात ठिकठिकाणी पाण्याची डबकी तयार झाली आहेत. काही टाक्यांमध्ये पाणी साचले आहे. या पाण्यात मोठ्या प्रमाणात डेंग्यूच्या अळ्यांची उत्पत्ती होत आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाने आज मंगळवारी (दि. 17) पाहणी केली. या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात डेंगूच्या अळ्या आढळून आल्या. त्यामुळे महाविद्यालय व्यवस्थापनाला पाच हजार रुपयांचा दंड बजावला आहे, असे आरोग्य अधिकारी डॉ. रॉय यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button