असंघटीत मजुरांना अन्नधान्य व किमान वेतन देण्यात यावे – मीना मोहिते
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/A-Gallery_17.jpg)
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
असंघटित व मोलमजुरी काम करणारे कामगार यांना अल्पदरात अन्नधान्य पुरवठा व किमान वेतन देण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी असंघटीत कामगार विभाग पुण्याच्या अध्यक्षा मीना मोहिते यांनी केली आहे.
यासंदर्भात जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांना निवेदन देण्यात आले आहे, त्यात म्हटले आहे की, राज्यातील कोरोंना – कोविड – १९ व्हायरसच्या पादुर्भाव मुळे राज्यात संचारबंदी कायदा लागू करणेत आलेला असल्याने, व्यापारी, उद्योगधंदे व संबधित व्यावसायिक दुकाने बंद आहेत. दैनदिन काम करणारे व हातावर पोट भरणारे असंघटित व मोलमजुर यांस आज रोजी कोणत्याही प्रकारचे कामधंदा नसल्याने, त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.
असंघटित व मोलमजुरी काम करणारे कामगार यांचे कौटोबींक तसेच आर्थिक स्वारस्य हरवून सामजिक घडी विस्कळीत होईल. सदर बाब राज्याच्या विकासाला शोभनिय नसून, बाधा निर्माण करणारी आहे. सदर निवेदनाद्वारे आपले लक्ष वेधण्यात येते की, असंघटित व मोलमजुरी काम करणारे कामगार यांस अल्पदरात अन्नधान्य व किमान वेतन देण्या बाबत आपणाकडून उचित दखल घ्यावी, असे संघटनेच्या वतीने विनंती करणेत आली आहे.