breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

असंघटीत कामगारानी कौशल्यातून विकास साधावा 

–  चिंचवड येथे कौशल्य विकास मेळावा संपन्न
पिंपरी – असंघटीत  कामगारांचे  जिवन संघर्षमयी आहे. पारंपारिक कामातच कार्यकुशलता आणुन त्यास आधुनिकतेची जोड देऊन आपला विकास  साधावा, असे आवाहन राजीव भिसे  यानी केले.
चिंचवड येथे कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे कौशल्य विकास मेळाव्याचे आयोजन केले होते.  यावेळी कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष  काशिनाथ नखाते, उपाध्यक्ष  राजेश माने, अनिल बारावकर ,तुषार घाटूळे, समन्वयक मानिषा  राउत, माधुरी जलमुलवार ,दादा खताळ,अरुणा सुतार,सुखदेव कांबळे,सखाराम हान्गे,अविदा गायकवाड ,उषा  भिसे,वर्षा हंकारे , सारिका मिसाळ,छाया येड़गे,सुनिता पखवाले ,वंदना थोरात आदी उपस्थित होते.
भिसे म्हणाले की, असंघटीत कामगारांनी पांरपारीक कामाबरोबरच आधुनिकतेची कास धरत त्यात आवशक बदल करावा, त्यातूनच आपला विकास करता येईल. महाराष्ट्रतील  शेतकरी वर्गाने  उभा केलेल्या पणन संस्था, बेंगलोर येथील कामगारानी उभारलेली कामगार सुची ,यातुन नविन पर्याय निर्माण झाले. कामाचा  दर्जा व कामाचे प्रमाण  वाढले आहे. यापुढे अधिकाराच्या लढाईबरोबर अस्तित्वाची लढाई लढावी लागेल.
छोट्या-छोट्या व्यवसायातून मार्केटिंगचे प्रशिक्षण दिल्यास सध्याच्या युगात हे असंघटीत कामगार टिकतील. असे त्यांनी सांगितले.
काशिनाथ नखाते यांनी असंघटीत कामगारांना  भेडसावणारे प्रश्न मांडले, फेरीवाला घटकास आता मॉल संस्कृतीशी लढावे लागणार आहे. त्याहीपेक्षा उत्तम दर्जा आणि वस्तू विक्री कौशल्य वाढवण्याची गरज आहे. विधवा महिलांनी व्यवसाय  प्रशिक्षणातून त्याना उभे करणे शक्य आहे. पुढील काळात कामगारांची स्वताची बाजारपेठ आणि केंद्र उभारता येईल. बांधकाम कामगाराना कौशल्य प्रशिक्षण दिल्यास यापुढे सुरक्षिततेसह आर्थिक विकास साधता येणे शक्य आहे. असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमाचे धर्मेंद्र पवार यानी प्रास्ताविक केले. तर भास्कर राठोड यानी आभार मानले.
Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button