breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

असंघटित कष्टकरी साहित्य  संमेलन बोधचिन्हाचे अनावरण 

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी-चिंचवड येथील नियोजित असंघटीत कष्टकरी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण कष्टकरी कामगारांचे हस्ते आज (रविवारी) करण्यात आले.

पिंपरी-चिंचवड राज्यातील पहिले असंघटीत कष्टकरी साहित्य संमेलानाची जोरदार तयारी सुरु आहे. शहरात विविध ठिकांणचे कामगांराना माहिती देण्यात येत आहे . जेष्ठ कामगार जरिता वाठोरे यांच्या हस्ते बोध चिन्हाचे अनावरण करण्यात आले. यावेळी सुनंदा चिखले, मनीषा राउत ,  अनिता राठोड ,  माधुरी जलमूलवार ,बालाजी इंगळे,  मधुकर वाघ, राजू  बिराजदार ,साइनाथ खंडीझोड़ , इरफ़ान चौधरी , यासीन शेख , सुरेश देड़े,  उमेश डोर्ले, तुकाराम मने  ,रजाक शेख , सुनील कांबळे ,   ओमप्रकाश  मोरया , सखाराम केदार  , इरफ़ान मुल्ला , आदी उपस्थित होते, असंघटित कामगारांनी आपल्या कविता,  लेख  आपल्या शब्दात लिहून सादर कराव्यात असे आवाहन संमेलनाचे  स्वागताध्यक्ष  काशिनाथ  नखाते यानी यावेळी केले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button