‘अभाविप’च्या प्रदेश अधिवेशनाचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याहस्ते उद्घाटन
![Union Minister Prakash Javadekar inaugurated the state convention of 'ABVP'](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/02/EtnUypDVkAIwZSZ.jpg)
- अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे विविध उपक्रमांचे आयोजन
पिंपरी । प्रतिनिधी
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश अधिवेशनाचे उद्घाटन केंद्रीय पर्यावरण, वन आणि माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले.
यावेळी अभाविपचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. छगनभाई पटले, विशेष अतिथी पद्मश्री गिरीश प्रभुणे, पिंपरी-चिंचवडच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे, प्रदेशाध्यक्ष प्रा. सारंग जोशी, प्रदेश मंत्री सिद्धेश्वर लटपटे, स्वागत समितीचे अध्यक्ष सुधीर मेहता, स्वागत समितीचे सचिव मोरेश्वर शेडगे, महानगर अध्यक्ष प्रा. शिल्पा जोशी, महानगर मंत्री प्रथमेश रत्नपारखी आदी उपस्थित होते.
अभाविप महाराष्ट्र प्रदेशाच्या ५५ व्या अधिवेशनामध्ये प्रदेशाध्यक्ष प्रा. सारंग जोशी आणि प्रदेशमंत्री स्वप्नील बेगडे यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच, क्रांतिवीर चापेकर बंधू प्रदर्शनीचे उद् घाटन श्रीमती प्रतिभाताई चापेकर यांच्याहस्ते करण्यात आले.
यावेळी प्रमुख अतिथी नीलकंठ चिंचवडे, प्रदेश अभाविपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. सुरेश मुंडे, सहमंत्री नागसेन पुंडगे, पिंपरी-चिंचवड महानगर उपाध्यक्ष निलेश बिराजदार, सहमंत्री सिद्धी जोशी उपस्थित होते.