breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

अनधिकृत होर्डींग्ज हटविताना पालिकेच्या अधिका-यांवर राजकीय दबाव

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – कुदळवाडीतील मुख्य चौकात पाच अनधिकृत होर्डींग्जपैकी तीन होर्डींग्जवर कारवाई करण्यात आली. मात्र, अन्य दोन होर्डींग्जवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या अधिका-यांवर पालिकेतील सत्ताधारी पक्षाच्याच राजकीय पदाधिका-यांकडून दबाव टाकला जात आहे. त्यामुळे आकाश चिन्ह परवाना विभागाच्या सूचनेनुसार कारवाई करण्यास कर्मचारी धजावत नसल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात अनधिकृत होर्डींग्जचे स्तोम माजले आहे. त्यामुळे आकाश चिन्ह परवाना विभागाच्या सूचनेनुसार अनधिकृत होर्डींग्जवरील कारवाई तिव्र करण्यात आली आहे. मात्र, शहरातील प्रमुख चौक आणि गजबजलेल्या ठिकाणी असलेल्या अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई करताना अधिका-यांवर राजकीय दबाव वाढत आहे. महापालिकेत बसलेले भाजपचे पदाधिकारीच दबाव आणत असल्याची धक्कादायक माहिती आहे. कुदळवाडी येथील मुख्य चौकात पाच अनधिकृत होर्डींग्ज आहेत. त्यातील तीन होर्डींग्जवर कारवाई करण्यात आली. मात्र, अन्य दोन होर्डींग्जवरील कारवाई रोखण्यासाठी राजकीय दबाव वाढत आहे. कर्मचारी कारवाई करण्यास धजावत नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शहराच्या विद्रुपीकरणास पालिकेचे अधिकारी नव्हे, तर राजकीय पदाधिकारीच जबाबदार असल्याचे यातून स्पष्ट होत आहे. त्यामुळे अनधिकृत होर्डींग्ज हटविण्याचे आव्हान आयुक्त श्रावण हार्डीकर यांच्यासमोर निर्माण झाले आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button