breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

अनधिकृत होर्डिंग्ज, टप-यावर कारवाई करा – महापाैर राहूल जाधव

  • महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांना आदेश

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी चिंचवड शहराचे विद्रुपीकरण वाढवणा-या अनधिकृत होर्डिंग्ज मुजोर ठेकेदारावर, टप-या, हातगाडी यांच्यावर कडक कारवाई करा, असे आदेश महापाैर राहूल जाधव यांनी दिले. याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांना आदेश दिले.

महापालिकेची अर्थसंकल्प मंजुरीसाठी आज (शनिवारी) विशेष महासभा घेण्यात आली. या सभेच्या अध्यक्षस्थानी महापाैर जाधव होते. यावेळी ते म्हणाले की, शहरात अनधिकृ होर्डिंग्ज आणि टप-याचे पेव फुटले आहे. त्यावर अतिक्रमण विभागाचे नियंत्रण नाही. हे मुजोर लोक आता नगरसेवकांवर गुन्हे दाखल करु लागले आहेत. त्या लोकांना हाॅकर्स झोन उपलब्ध करुन दिलेले नाही, म्हणून शहराचे बकालीकरण वाढले आहे. संबंधित लोकांनावर कारवाई करण्याच्या सुचना महापाैर जाधव यांनी दिल्या.

नगरसेवक शितल शिंदे म्हणाले की, चिंचवडमधील एल्प्रो चाैकात अनधिकृत हातगाडे हटविण्यात तेथील वाहतूक कोंडी सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, महापालिकेच्या जागेवर हातगाडी लावणा-या एकाने थेट माझ्यावर पोलिसात तक्रार दिली. त्यामुळे अतिक्रमण विभागाचे काम आम्हाला करावे लागत आहे.

नगरसेवक अंबर कांबळे म्हणाले की, माझ्या प्रभागात अमृत योजनेतून 24 बाय 7 योजनेचे काम निकृष्टपणे सुरु आहे. रस्त्याची कामेही निकृष्ट होत आहेत. पाणीपुरवठा सुरळीत नाही. अधिकारी व ठेकेदार मनमानी कामे करु लागले आहेत. त्यामुळे प्रभागातील कामाची आपण पाहणी करुन संबंधितावर कडक कारवाई करावी,

नगरसेवक पंकज भालेकर म्हणाले की, महापालिका अर्थसंकल्पात फ क्षेत्रीय कार्यालयास सर्वात कमी तरतूद ठेवली आहे. आयुक्त साहेब आमच्याकडून कर वसुल करता. मग आम्हाला दुजाभाव का? करता. नागरिकांना सोयी सुविधा कधी देणार आहे. एकीकडे स्मार्ट सिटी शहर करताय, पण आम्ही रस्ते, गटारी, अजूनही भांडतोय, हा विकासाचा असतोल साधला जातोय.

नगरसेवक राहूल कलाटे म्हणाले की, साहेब तुमचं शहरावर अजिबात लक्ष नाही. तुम्ही अजूनही सुट्टी आणि निवडणुक माहोलमधून बाहेर आलेले नाही. तुम्ही सगळ्या प्रभागात फिरलेला नाही. शहरातील टपरी, हातगाडीवाले नगरसेवकावर गुन्हे दाखल करतात. आता तुम्ही त्या हातगाडीवाले यांच्यावर गुन्हे दाखल करा.

उपमहापाैर सचिन चिंचवडे म्हणाले की, पावसाळा तोंडावर आलाय, नालेसफाई अजूनही पुर्ण झालेली नाही. माझ्या प्रभागात नाले पुर्ण बुजवून त्यावर पत्राशेड उभारण्यात येवू लागलेय. त्यावर कारवाई केली जात नाही. पवना नदीचे पाणी प्रदुषित आहे. अनेक नळांना गळती असल्याने दुषित पाणी पुरवठा होत आहे.

पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले की, मुजोर ठेकेदार, अनधिकृत ठेकेदार, हाॅकर्सवाले यांच्यावर तातडीने कारवाई करा, शहरातील चाैकाचाैकात अनधिकृत होर्डिंग्ज, टपरी, हातगाडे यांना हटविल्याशिवाय शहर स्मार्ट होणार नाही. अतिक्रमण विभागाने येत्या 15 दिवसात सर्व अतिक्रमणावर कारवाई न केल्यास अधिका-यावर कारवाई करा, असे आदेश महापाैर तुम्ही आयुक्तांंना द्या, अशी मागणी त्यांनी केली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button