अधिकारी व कर्मचा-यांनी निवृत्तीनंतर आपले आरोग्य सांभाळावे – विलास मडिगेरी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/DSC_6922.jpg)
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
सेवानिवृत्त होणा-या अधिकारी व कर्मचारी यांनी निवृत्तीनंतर आपले आरोग्य सांभाळावे तसेच सेवानिवृत्ती वेतनाच्या रकमेचे योग्य नियोजन करावे, असे मत स्थायी समिती सभापती विलास मडीगेरी यांनी व्यक्त केले.
पिंपरी-चिंचवड महापालिका सेवेतून माहे फेब्रुवारी २०२० अखेर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणा-या २३ तसेच स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या ३ अशा एकूण २६ कर्मचा-यांचा सत्कार स्थायी समिती सभापती विलास मडीगेरी यांच्या हस्ते पुस्तक, स्मृतीचिन्ह, सेवा उपदान धनादेश सुपूर्द करुन करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
कै. मधुकर पवळे सभागृह, मनपा मुख्य प्रशासकीय इमारत येथे झालेल्या या कार्यक्रमास कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या सचिव सुप्रिया सुरगुडे, सहसचिव बाळासाहेब कापसे, धनाजी नखाते, धनेश्वर थोरवे, मिलिंद काटे, गोरख भालेकर, रणजीत भोसले, अविनाश तिकोणे आदी उपस्थित होते.
महापालिका सेवेतून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्यांमध्ये मुख्य उद्यान अधिक्षक सुरेश साळुंखे, प्रशासन अधिकारी सुनंदा गवळी, सहाय्यक आरोग्याधिकारी ज्ञानेश्वर सासवडकर, उपअभियंता स्थापत्य चंद्रकांत कोंडे, मुख्याध्यापिका नसरिन शेख, सुधा सिंह, सिस्टर इनचार्ज प्रतिभा ननावरे, मुख्य लिपिक किशोर लोंढे, सुरेंद्र भुजबळ, आरोग्य सहाय्यक तुकाराम पाटील, ए.एन.एम. सुरेखा काची, नर्स मिडवाईफ, सरस्वती परदेशी, वाहनचालक शंकर शेलार, उपशिक्षिका अरुणा बरडे, आशा खुडे, त्रिवेणी पावडे, मुकादम चंद्रकांत चौधरी, आया नर्मदा फंड, मजूर दासू नवघणे, रघुनाथ काळभोर, ज्ञानेश्वर लांडे, सफाई कामगार प्रभा छत्री यांचा समावेश आहे तर स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्यांमध्ये उपशिक्षिका विद्या काळे, सफाई कामगार चंद्रभागा कळसकर,
गटरकुली शिवाजी लोंढे यांचा समावेश आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.