breaking-newsपिंपरी / चिंचवड

अतिक्रमण व उपद्रव शोध पथकाच्या कर्मचा-यांचा महापालिकेत ठिय्या

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी पालिका भवनात कोणतीही व्यवस्था नसल्याने त्यांना दिवसभर उघड्यावर बसावे लागते. तसेच, कोरोना संकट काळात कामाचा अतिरिक्त ५० टक्के मेहनताना दिला गेलेला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी पालिका भवनाच्या प्रवेशद्वारावर शुक्रवारी दि (दि. १०) ठिय्या आंदोलन केले.

अतिक्रमण निर्मूलन विभाग पूर्वी क्षेत्रीय कार्यालयानिहाय कार्यरत होता. गेल्या ३ वर्षांपासून हा विभाग एकत्रित करण्यात आला आहे. या विभागात तब्बल ३०० जण कार्यरत आहेत. त्यांना पालिका भवनात बसण्यासाठी आणि जेवणासाठी जागा उपलब्ध नाही. हा प्रश्न प्रशासनाने अद्यापि सोडविलेला नाही. तसेच कोरोना काळात महामारीत कोरोना नियंत्रण पथकात सुटी न घेता अनेक कर्मचाऱ्यांनी काम केले. त्यांना अतिरिक्त ५० टक्के मेहनताना देण्याची ग्वाही देऊन ३ महिने उलटूनही दिला गेलेला नाही. या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी संतप्त कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी ठिय्या आंदोलन केले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button