अजित पवार आणि आझम पानसरे यांचा तो व्हिडीयो व्हायरल, राजकीय क्षेत्रात चर्चेला उधान (पहा व्हिडिओ)
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/azam-pansare.jpg)
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहर भाजपचे दिग्गज नेते आझम पानसरे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात पानसरे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाल्याचे दिसत आहे. मात्र, हा व्हिडिओ जुना असल्याचे पानसरे समर्थकांनी सांगितले आहे. राजकीय क्षेत्रात दिशाभूल करण्यासाठी हा जुना व्हिडीओ कोणीतरी व्हायरल केल्याचे सांगण्यात येत आहे.
पिंपरी-चिंचवडच्या राजकारणार आझम पानसरे यांचे मोठे स्थान आहे. एक दिग्गज नेते म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांनी महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपत प्रवेश केला. त्यांच्या ताकदीचा करिष्मा महापालिका निवडणुकीत सर्वांनाच आला आहे. मात्र, पक्षात येण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी त्यांना महामंडळावर संधी देण्याचा शब्द दिला होता. तो त्यांनी पाळला नाही म्हणून पानसरे आजकाल नाराज दिसतात. या नाराजीतून ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचेही काहीजण सांगतात. त्यातच, आता शहराचे पूर्वसुरीचे कारभारी अजित पवार यांच्यासोबतचा पानसरे यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात आझम पानसरे, शिवसेनेचे संजय काटे हे पवार यांच्या बाजुला उभारलेले दिसतात. मात्र, हा व्हिडीओ पूर्वीचा असल्याचे पानसरे समर्थकांनी सांगितले आहे.
पानसरे समर्थक नगरसेवक शैलेश मोरे म्हणाले की, आझमभाई राष्ट्रवादीत जाणे शक्य नाही. ते भाजपमध्येच आहे. अजित दादांसोबतचा जो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. तो जुना आहे. ज्यावेळी आम्ही काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर राष्ट्रवादीत परतलो. त्यावेळी अजित दादा माध्यमांसमोर बोलतानाचा तो व्हिडिओ आहे. भाईंनी नुकतेच राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचा तर्क या व्हिडीओवरून लावणे चुकीचे आहे.
माजी नगरसेवक व शिवसेनेचे संजय काटे म्हणाले की, कोणीतरी लोकांची दिशाभूल करण्यासाठी जुना व्हिडीओ व्हायरल केला आहे. लोकांनी या व्हिडीओवर विश्वास ठेवू नये. मी राष्ट्रवादीचा नगरसेवक असताना माजी महापौर आझम पानसरे हे काँग्रेसमधून राष्ट्रवादीत आले. त्यावेळचा हा व्हिडीओ आहे.