पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेतर्फे विविध कल्याणकारी योजना तात्काळ राबवाव्यात
मा. नगरसेविका आशा धायगुडे यांचे महापालिका आयुक्तांना निवेदन
पिंपरी-चिंचवडः पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. या योजनांमध्ये मागासवर्गीय कल्याणकारी योजना इ. १० व इ १२ वीच्या गुणवंत विध्यार्थांसाठीची योजना, अपंगासाठी योजना, परदेशात शिक्षणासाठीची योजना, इत्यादी अशा अनेक योजना आपण विद्यार्थांसाठी तसेच नागरीकांसाठी राबवत असतो. मात्र आचारसंहितेमुळे या योजना राबविण्यास ब्रेक लागला आहे. आता आचारसंहिता संपलेली आहे. त्यामुळे या योजनांची प्रभावी अंमलबजावाणी पुन्हा सुरू करण्यात यावी, असे निवेदन माजी नगरसेविका आशा धायगुडे यांनी महापालका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.
सदर निवेदनात धायगुडे यांनी म्हटले आहे की, सध्यस्थितीमध्ये सर्व शालेय विध्यार्थांचे निकाल लागले आहेत. परंतू सध्या सन २०२४ या वर्षाची लोकसभा निवडणुकीची आचारसहिता नुकतीच संपलेली आहे. मात्र, विधानसभा निवडणूक नोव्हेंबर २०२४ मध्ये येवू घातल्या आहेत. या सर्व प्रक्रियेत अवघे ३ ते ४ महिने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला योजना राबविण्यासाठी मिळणार आहे.
सर्व नमूद बाबींचा विचार करता लोकसभा निवडणूकीची आचारसहिता संपलेली असल्यामुळे ‘मनपाच्या विविध योजनांचे अर्ज नागरीकांपर्यंत पोहोचवावेत. सदर योजनांचे सर्व अर्ज नागरीकांपर्यंत पोहचविण्यासाठी लागणारी सर्व पूर्व तयारी जसे की अर्जांची छपाई, अटी शर्ती इत्यादी आपण त्वरीत करून घेण्यात यावी, असे निवेदनात म्हटले आहे.