breaking-newsताज्या घडामोडीराजकारण

वरसोली येथे पॅरासेलिंगचा दोर तुटून अपघात; दोन महिला बचावल्या, पर्यटकांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चच्रेत

अलिबाग |

अलिबाग तालुक्यातील वरसोली येथील समुद्रकिनारी पॅरासेलींग करताना दोर तुटून दोन महिला समुद्रात कोसळल्याची घटना समोर आली आहे. सुदैवाने या दोन्ही महिला बचावल्या आहेत. मात्र यामुळे इथं येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेचा मुददा ऐरणीवर आला आहे. २७ नोव्हेंबर रोजी मुंबईतील साकीनाका येथील काहीजण सहकुटुंब अलिबागला फिरायला आले होते.

वरसोली समुद्रकिनारी फिरत असताना त्यातील सुजाता नारकर व सुरेखा पाणीकर या दोन महिला पॅरासेलींग करण्यासाठी गेल्या . त्या पहिल्यांदाच पॅरासेलींगचा अनुभव घेत होत्या . पॅरासेलींग करताना अचानक दोर तुटल्याने त्या दोघी खाली पाण्यात कोसळल्या त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. बोटीवरील जीवरक्षकांनी दोघींनाही सुखरूप बाहेर काढले. ही दुर्घटना घडली तेव्हा या महिलांचे नातेवाईक त्या बोटीवर होते . त्यांच्यापकी एकाने त्याचे व्हिडिओ चित्रण केले त्यामुळे या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.

या अपघातात कोणतीही जीवीत हानी झाली नसली तरी पर्यटक आणि व्यावसायिकांनी सुरक्षेच्या सर्व उपाययोजना करणे गरजेचे आहे. मात्र आम्ही सर्व सुरक्षा व्यवस्था करत असतो यापुढेही सर्व काळजी घेतली जाईल असं पॅरासेलींग व्यावसायिक संजय पाटील यांनी सांगितले. ‘वरसोली समुद्रकिनारी पॅरासेलींगला नव्यानेच परवानगी देण्यात आली आहे. या घटनेनंतर सर्वच वॉटरस्पोर्टस व्यावसायिकांना सुरक्षेचे सर्व नियम पाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पर्यटकांच्या सुरक्षेसंदर्भात कोणतीही हयगय केली जाणार नाही. जर यंत्रणा संक्षम नसेल तर व्यवसाय बंद ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.’

– कॅ. के. सी. लेपांडे , प्रादेशिक बंदर अधिकारी , राजपुरी बंदर समुह

‘पॅरासेलींग करताना आम्ही सुरक्षेच्या सर्व नियमांचे पालन करतो. २७ तारखेला जी दुर्घटना घडली त्यावेळी दोरी तुटली नव्हती तर गाठ सुटल्ली होती. पॅरासेलींगच्या बलूनमुळे दोघी महिला हळूवारपणे पाण्यात पडल्या त्याना कोणतीच दुखापत झाली नाही. आमच्या रायडर्सनी काही सेकंदातच त्यांना सुखरूप बाहेर काढले. यापुढे सुरक्षेची अधिक काळजी घेतली जाईल.’

-संजय पाटील , पॅरासेलींग व्यावसायिक

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button