breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

‘आपला बाब्या कार्टं व्हायला फार वेळ लागणार नाही’; पंकजा मुंडेंचं सूचक विधान, चर्चांना उधान

आपण कुणासमोर झुकणार नाही

नाशिक : भारतीय जनता पार्टीच्या नेत्या पंकजा मुंडे या पतक्षात नाराज असल्याची चर्चा सातत्याने होत असते. पंकजा मुंडे यांनी अनेकदा आपण पक्षात नाराज नाही असं स्पष्टीकरण दिलं आहे. दरम्यान, नाशिक येथे केलेल्या एका विधानामुळे पुन्हा एकदा या चर्चांना उधान आलं आहे. आपण कुणासमोर झुकणार नाही, असं विधान त्यांनी केलं आहे. नेमकं हे कुणाला उद्देशून आहे, यावरून राजकीय वर्तुळात सध्या चर्चा सुरू आहे.

पंकज्या मुंडे म्हणाल्या की, आपला एक स्वभाव असतो. आपण आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्टं असं म्हणतो. आपला माणूस..आपला पक्ष.. आणी आपली सत्ता योग्य आहे, हे म्हटलंच पाहिजे कारण आपण खूप मेहनत आणि पराक्रम करून येथे आलेलो असतो. त्यामुळे आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्टं म्हणणं कधीतरी ठीक आहे. यामुळे आपल्या बाब्यालाही जार मूठभर मांस चढतं. पण प्रत्येकवेळी आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्टं म्हटलं तर आपला बाब्या कार्टं व्हायला फार वेळ लागणार नाही.

मी सात-आठ वर्षांची असेल. त्या काळात फोन नव्हते. मीडिया नव्हता. गोपीनाथ मुंडे एकदा प्रचाराला गेले, तर ते २० ते २२ दिवस पक्षाचा प्रचार करायचे. ते जेव्हा घरी परत यायचे, तेव्हा माझी आई त्यांचे कपडे धुवायची. तेव्हा त्यांच्या कपड्यांमधून प्रचंड माती आणि गाळ निघायचा. एवढी मेहनत गोपीनाथ मुंडे यांनी आपल्या पक्षासाठी घेतली, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button