breaking-newsTOP Newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीदेश-विदेशराष्ट्रिय

पाकिस्तानी ड्रोन पाडले, BSF जवानांची मोठी कारवाई

Pakistani Drone : भारत-पाकिस्तान सीमेवर पाक तस्करांचे ड्रोन घुसले असता हे ड्रोन पाडण्यात भारताच्या सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) जवानांना यश आलं आहे. तसेच ड्रोनसोबत ३.१ किलो हेरॉईन सापडलं असून त्याची आंतरराष्ट्रीय किंमत अंदाजे २१ कोटी रुपये असल्याची माहीती संजय गौर (डीआयजी बीएसएफ, अमृतसर) यांनी दिली आहे.

प्राप्त माहीतीनुसार, अमृतसरच्या आंतरराष्ट्रीय सीमा अटारीजवळ बीएसएफ जवानांना हे यश मिळालं आहे. त्यांना ३ ते ४ दिवसांपासून हेरॉईनची तस्करी होणार असल्याची माहीती मिळाली होती. बीएसएफचे जवान नेहमीप्रमाणे गस्तीवर होते. त्याचवेळी ड्रोनचा आवाज ऐकू आला आणि जवानांनी गोळीबार सुरू केला. काही मिनिटांतच ड्रोनचा आवाज बंद झाल्यानंतर जवानांनी परिसरात शोधमोहीम सुरू करत ड्रोन ताब्यात घेतला.

हेही वाचा – गुजरात टायटन्स संघातील खेळाडूची Love Jihad बद्दल पोस्ट, नंतर मागितली माफी

पाकिस्तानी ड्रोननी पंजाबमध्ये घुसखोरी करण्याच्या घटनांत गेल्या काही दिवसांमध्ये वाढ झाली आहे. महिन्याभरात जवानांनी पाच ड्रोन हाणून पाडले आहेत. त्यातील काही ड्रोन बीएसएफने गोळीबार करून पाडली आहे. राजस्थान, गुजरात, पंजाब येथून सीमा ओलांडून अंमली पदार्थांची भारतात तस्करी करण्याचे अनेकदा प्रयत्न झाले असून लष्करांनी ते हाणून पाडले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button