TOP Newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशपुणेमनोरंजनराजकारणराष्ट्रिय

2 ते 9 फेब्रुवारी दरम्यान पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन

पुणेः गेल्या काही दिवसांपासून काही कारणास्तव पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची तारीख निश्चित होत नव्हती. मात्र आता प्रतीक्षा संपली. हा उत्सव 2 ते 9 फेब्रुवारी दरम्यान साजरा केला जाणार आहे. अशी घोषणा करण्यात आली. पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने 2 ते 9 फेब्रुवारी दरम्यान 21 व्या ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’चे आयोजन करण्यात आले आहे. गर्दी आणि अनेक मान्यवरांच्या आगमनामुळे हा महोत्सव पालिका आणि राज्य सरकारने पुढे ढकलला होता. जानेवारीत होणारी महोत्सव आता फेब्रुवारीत होणार आहे.

‘पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’ला महाराष्ट्र सरकार आर्थिक मदत करणार आहे. या महोत्सवात 72 देशांतून 1574 प्रवेशिका आल्या होत्या. यातील 140 चित्रपट दाखवले जाणार आहेत. महोत्सवात प्रदर्शित होणारे सर्व चित्रपट + दर्जाचे आहेत.

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कुठे होणार?
सेनापती बापट रोड येथील पीव्हीआर आयकॉन, कॅम्प परिसरात आयनॉक्स आणि लॉ कॉलेज रोड येथील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय या तीन ठिकाणी नऊ स्क्रीनवर चित्रपट दाखवले जातील. यंदाच्या समारंभात एक भारतीय आणि इतर दोन देश ज्युरी सदस्य म्हणून असतील. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया 5 जानेवारीपासून सुरू होणार असून 19 जानेवारीपासून ऑन द स्पॉट नोंदणी सुरू होणार आहे. संपूर्ण महोत्सवासाठी नोंदणी शुल्क सर्वसामान्य प्रेक्षकांसाठी 800 रुपये आणि ज्येष्ठ नागरिक, फिल्म क्लब सदस्य आणि विद्यार्थ्यांसाठी 600 रुपये आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button