ताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

पद्मविभूषण शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कष्टकऱ्यांना मायेची ऊब

कष्टकरी कामगारांना ब्लॅंकेटचे वाटप

पिंपरी चिंचवड़ : देशाच्या राजकारणात तब्बल पाच दशकावून अधिक काळ सातत्यपूर्ण यशस्वीरित्या कामगिरी बजावणारे देशाचे नेते पद्मविभूषण शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सध्या थंडीचे दिवस असल्याने पिंपरी चिंचवड शहरातील २५१ गरजू कष्टकरी कामगारांना मायेची उब अर्थात ब्लॅंकेट चे वाटप करण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष , कष्टकरी संघर्ष महासंघ, नॅशनलिस्ट ट्रेड युनियन यांचे तर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी असंघटित कामगार विभाग प्रदेशाध्यक्ष काशिनाथ नखाते, सामाजिक कार्यकर्ते सचिन नागणे, महासंघाचे कार्याध्यक्ष राजू बिराजदार, कामगार विभाग कार्याध्यक्ष नाना कसबे,सलीम डांगे,फरीद शेख आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी कामगार नेते काशिनाथ नखाते म्हणाले की सलग चार वेळा राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषवणारे शरद पवार साहेब यांनी राज्याला औद्योगिक, कामगार,शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, कृषी, क्रीडा, साखर, विज्ञान आणि संशोधन अशा विविध क्षेत्रात महाराष्ट्र राज्याला अग्रेसर घेऊन गेले आहेत. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री नामदार यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर त्यांचा वारसा यशस्वीरित्या पवार साहेब चालवत आहेत महिलांना समान संधी दिल्याशिवाय परिवर्तन होणार नाही हे ओळखून पवार साहेबांनी महिलांना प्रत्यक्ष सातत्याने महत्त्वाचा वाटा दिला. कृषी मालाला हमीभाव मिळवून देणे. कामगाराला कायद्याप्रमाणे लाभ देणे,शेतकरी व ग्राहक यांच्या भावाबाबत समतोल राखणे शिक्षणाचे मोल पटवून त्यामध्ये अग्रेसर बदल करून घेतले.

कामगारांच्या प्रश्नावरती प्रत्येक वेळा स्वतः कामगार लढ्यामध्ये सहभागी होऊन अथवा अनेक कामगार विषय जिव्हाळ्याचे असल्यामुळे त्यांनी शेतकरी आणि कामगारांच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्याला बोलवून घेऊन त्याबाबत केंद्र व राज्य सरकार वरती पाठपुरावा केला देशाच्या आणि राज्याच्या राजकारणावर मजबूत पकड ठेवणारे नेते म्हणून शरद चंद्र पवार यांच्या नावाचा दबदबा अजूनही कायम आहे. कायम लोकात वावरणारे प्रगल्भ राजकारणी म्हणून पवार साहेबांचा मान कदापिही कमी होणार नाही महाराष्ट्राचा मानबिंदू म्हणून पवार साहेबांकडे पाहिले जाते. त्यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमध्ये हा उपक्रमकचे नियोजन करण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button