breaking-newsताज्या घडामोडीपाटी-पुस्तकराष्ट्रिय

NEET 2020 परीक्षेसाठीच एडमिट कार्ड आज रिलिज केलं जाण्याची शक्यता

देशात होत असलेल्या विरोधाला डावलून नीट आणि जेईईची मुख्य परीक्षा आपल्या निर्धारित वेळेतच होणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजेंसीकडून घेतली जाणारी NEET 2020 परीक्षेसाठीच अॅडमिट कार्ड आज रिलिज केलं जाण्याची शक्यता आहे. ही परीक्षा 13 सप्टेंबर 2020 रोजी देशातील विविध शहरांमधील परीक्षा केंद्रांवर आयोजित केली जाणार आहे. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळं नीट परीक्षेसाठी परीक्षा केंद्रांची संख्या 2846 वरुन वाढवून 3,843 केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार एनटीए आज नीट यूजी परीक्षेसाठी अॅडमिट कार्ड रिलिज करु शकते. या परीक्षेसाठी सर्व परीक्षार्थिंना भारत सरकारच्या गृह मंत्रालय आणि राज्य सरकारकडून दिलेल्या नियमांचं पालन करने गरजेचं असणार आहे.

परीक्षार्थिंना परीक्षा केंद्रांवर परीक्षा सुरु होण्याआधी कमीत कमी दोन तास आधी पोहोचणे आवश्यक असणार आहे. तसेच दोन विद्यार्थ्यांमध्ये 6 फुटांचं अंतर ठेवलं जावं, पाण्याची बॉटल स्वत: आणावी तसेच सोशल डिस्टन्सिंगची काळजी घेतली जाणार आहे. जेईई आणि नीट परीक्षांसाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने राज्यनिहाय सेंटर्सची लिस्ट घोषित केली आहे. शिक्षण मंत्रालयाकडून घोषित केलेल्या लिस्टमध्ये जेईई परीक्षेसाठी सेंटर्स 570 वरुन वाढवून 660 केले आहेत तर नीट परीक्षेसाठी सेंटर्स 2846 वरुन वाढवून 3843 केली आहेत.

‘ जेईई परीक्षा एक ते 6 सप्टेंबर दरम्यान होईल आणि नीट परीक्षा 13 सप्टेंबर रोजी होणार आहे. जेईई मुख्य परीक्षांसाठी नंबर ऑफ शिफ्ट्स देखील वाढवल्या आहेत. आधी या परीक्षेसाठी आठ शिफ्ट निश्चित केल्या होत्या. आता त्या वाढवून 12 केल्या आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून जारी केलेल्या परिपत्रकात असं सांगण्यात आलं आहे.

जेईई मेन्स आणि नीट परीक्षा 2020 टाळणं शक्य नाही असं नॅशनल टेस्टिंग एजन्सीने स्पष्ट केलं आहे. येत्या 13 सप्टेंबरला नीट परीक्षा पार पडणार आहे. मात्र अजूनही ही परीक्षा स्थगित करण्याची मागणी केली जात आहे. मात्र आता कोणत्याही परिस्थितीत परीक्षा जास्त टाळू शकत नाही असं सरकारने स्पष्ट केलं आहे. एनटीएने परीक्षा सेंटर इत्यादींच्या बाबतीत आधीच विद्यार्थ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. अॅडमिट कार्ड रिलीज झाल्यानंतर ntaneet.nic.in या वेबसाईटवरून हे अॅडमिट कार्ड डाऊनलोड करता येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button