ताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

नर्मदा परिक्रमा आयुष्यातील मोठी तपस्या आहे : शरदचंद्र प्रतापे महाराज

पिंपरीत नर्मदा परिक्रमा वासियांचा मेळावा उत्साहात

पिंपरी : नर्मदा परिक्रमा ही फक्त परिक्रमाच नसून ती आयुष्यातील खूप मोठी साधना व तपस्या आहे. आयुष्यात प्रत्येकाने एकदा तरी नर्मदा परिक्रमा करावी. नर्मदा ही जीवनदायीनी आहे. अनेक लोकांचे जीवन सुफलित केले आहे. परिक्रमेत प्रत्येकालाच तिची अनुभूती वेगवेगळ्या रूपात येते. ती मोक्षदायिनी आहे, असे प्रतिपादन गुजरात मधील भालोद येथील जेष्ठ नर्मदा परिक्रमावासी, दत्त उपासक शरदचंद्र प्रतापे महाराज यांनी केले.

नर्मदे हर पिंपरी चिंचवड संघाच्या वतीने पिंपरीत आयोजित केलेल्या नर्मदा परिक्रमा वासियांचा मेळावा उत्साहात पार पडला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या वेळी वासुदेव निवास पुणे येथील जेष्ठ साधक हेरंब शिंदे, ज्येष्ठ परिक्रमावासी विश्वास तावसे, पाच वेळा पायी परिक्रमा करणारे नगर येथील मिलिंद भारदे, नर्मदा परिक्रमा पुस्तकाचे लेखक शिवाजी केसरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

या मेळाव्यात औरंगाबाद, नाशिक, नगर, सांगली, सातारा, कोल्हापूर व मुंबई येथील नर्मदा भक्त उपस्थित होते. यावेळी नवोदित परिक्रमा वासियांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच अनेक ज्येष्ठ परिक्रमावासियांनी आपल्या अनुभवाचे कथन केले.

या कार्यक्रमाचे आयोजन सुदाम वाणी यांनी केले. संदीप शिंदे, रवींद्र भिसे, मंगेश आपटे, संतोष ताम्हणकर, रमेश जोगळेकर, विठ्ठल लोहार यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अपर्णा बोरकर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप शिंदे यांनी केले. पांडुरंग फाकटकर यांनी आभार मानले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button